रशियाच्या लष्करी प्रशिक्षण मैदानात झालेल्या गोळीबारात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. बेलगोरोड भागात बंदुक चालवण्याच्या प्रशिक्षणादरम्यान शनिवारी ही घटना घडल्याची माहिती ‘रॉयटर्स’ या वृत्त संस्थेने दिली आहे.

युक्रेनला अमेरिकेची अतिरिक्त मदत

“युक्रेनविरुद्धच्या युद्धात स्वेच्छेने सहभागी होण्याची काही नागरिकांनी इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्यासाठी बंदूक चालवण्याचे सत्र भरवण्यात आले होते. या प्रशिक्षणादरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला, अशी माहिती रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने निवेदनाद्वारे दिली आहे. चकमकीनंतर दोन हल्लेखोरांना सुरक्षादलांनी ठार केले.

युक्रेनच्या राजधानीची वीज, पाणीपुरवठा यंत्रणा लक्ष्य 

ही घटना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासाठी आणखी एक धक्का मानला जात आहे. युक्रेनजवळ असलेल्या लष्करी भागात ही घटना घडल्याची माहिती रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. या घटनेतील दोन हल्लेखोर हे भूतपूर्व सोवियत गणराज्याचे नागरिक होते.

पुतीन यांना ‘ही युद्धाची वेळ नव्हे’ सांगणाऱ्या नरेंद्र मोदींचे युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी मानले आभार, म्हणाले “अखंडता…”

दरम्यान, रशिया आणि युक्रेनमधील युद्धाची झळ संपूर्ण जगाला पोहोचत असतानाच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी गंभीर इशारा दिला आहे. नाटोच्या फौजांची रशियाच्या लष्कराशी चकमक झाल्यास जगभरात विध्वंस होईल, असे पुतीन यांनी म्हटले आहे. कझाकिस्तानची राजधानी अस्तानामध्ये पार पडलेल्या पत्रकार परिषदेतील पुतीन यांच्या या वक्तव्यानंतर जगाच्या चिंतेत भर पडली आहे. त्यातच रशियाच्या लष्करी मैदानावर झालेल्या या हल्ल्यानंतर रशियाचे पुढचे पाऊल काय असेल, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.