scorecardresearch

गुजरातमध्ये पहिल्या आंतरराष्ट्रीय बुलियन एक्सचेंजची स्थापना; आता परदेशातून सोन्याची आयात करणे होणार सोपे

शांघाय गोल्ड एक्सचेंज आणि बोर्सा इस्तंबूलच्या धर्तीवर देशातील पहिले आंतरराष्ट्रीय बुलियन एक्सचेंज स्थापन करण्यात आले आहे.

First international bullion exchange established in Gujarat
गुजरातमध्ये पहिल्या आंतरराष्ट्रीय बुलियन एक्सचेंजची स्थापना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरामधील गांधी नगर येथे देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय बुलियन एक्सचेंजचे (IIBX) उद्घाटन केले. या बुलियन एक्सचेंजच्या माध्यमातून आता देशातील सोने-चांदीच्या व्यापाऱ्यांना परदेशातून सोने आयात करणे सोपे होणार आहे. शांघाय गोल्ड एक्सचेंज आणि बोर्सा इस्तंबूलच्या धर्तीवर हे एक्सचेंज स्थापन करण्यात आले आहे. या एक्सचेंजद्वारे डीलर्स, रिफायनरीज आणि परदेशी बँकांना भारताकडे आकर्षित करण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा- गरज भासल्यास कर्नाटकातही योगी मॉडेल -मुख्यमंत्री बोम्मई ; भाजयुमो कार्यकर्त्यांच्या हत्येचा तपास एनआयएकडे

सध्या सोन्याच्या व्यापारालाच परवानगी

गांधीनगर जवळील गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी (GIFT सिटी) येथे आंतरराष्ट्रीय बुलियन एक्सचेंजची स्थापना करण्यात आली आहे. देशातील हे पहिले आंतरराष्ट्रीय सराफा एक्सचेंज असेल. भविष्यात एक्सचेंजमध्ये चांदीचा व्यापार करण्याची योजना आहे, परंतु सध्या फक्त सोन्याच्या व्यापाऱालाच मान्यता देण्यात आली आहे.

एक्सचेंजमुळे काय फायदा होईल?
सध्या फक्त काही बँका आणि केंद्रीय बँकांनी मंजूर केलेल्या नामांकित एजन्सींना थेट सोने आयात करण्याची परवानगी होती. आता देशातील पहिले आंतरराष्ट्रीय बुलियन एक्स्चेंज सुरू झाल्यानंतर, पात्र ज्वेलर्स सोन्याची थेट आयात करू शकतील. त्यावर स्थानिक शुल्क आकारले जाणार नाही. मात्र, ही सूट सोने शहराबाहेर नेईपर्यंतच मिळणार आहे.

हेही वाचा- संसदेतील वाद आणखी तीव्र ; विरोधक-सत्ताधारी आक्रमक, गदारोळामुळे कामकाज स्थगित

तरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण मुख्यालयाच्या इमारतीची पायाभरणी

देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय बुलियन एक्सचेंज व्यतिरिक्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी NSE IFSC-SGX कनेक्ट प्लॅटफॉर्मचेही उद्धाटन केले आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे, सिंगापूर स्टॉक एक्स्चेंजचे सदस्य NSE IFSC मध्ये निफ्टी डेरिव्हेटिव्हसह व्यापार करू शकतील. तसेच आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण मुख्यालयाच्या इमारतीची पायाभरणी मोदींच्या हस्ते करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-07-2022 at 09:37 IST