करोना विषाणूचा धोकादायक प्रकार असलेल्या ओमायक्रॉनने देशात प्रवेश केला आहे. कर्नाटकातील दोन रुग्णांमध्ये या प्रकाराची लागण झाल्याचे समोर आले आहे. दोन्ही बाधित रुग्ण आफ्रिकेतून आले होते. संयुक्त आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, या रुग्णांमध्ये जीनोम सिक्वेन्सिंगद्वारे या विषाणूच्या प्रकरणांची पुष्टी झाली आहे. संक्रमित आढळलेल्या रुग्णांपैकी एक ६४ वर्षांचा आहे, तर एक व्यक्ती ४६ वर्षांचा आहे. केंद्रीय संयुक्त आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, ज्या दोन लोकांमध्ये हा विषाणू आढळून आला आहे, ते दोघेही कर्नाटकचे रहिवासी आहेत. या दोन्ही रुग्णांमध्ये केवळ किरकोळ लक्षणे आढळून आली असून त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.

ब्रुहत बंगळूरू महानगर पालिकेने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार दोन ओमायक्रॉन संक्रमित रुग्णांपैकी एका व्यक्तीने दुबई पर्यंत प्रवास केला होता. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, २० नोव्हेंबर रोजी भारतात आलेल्या ६६ वर्षीय व्यक्तीचा कोविड-१९ अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तरीही त्याने सात दिवसांनी दुबईसाठी उड्डाण घेतले. त्या व्यक्तीने करोनावरील लसीचे दोन्ही डोस मिळाले होते.

India Wholesale Inflation Reaches 3 Month High
घाऊक महागाई दर मार्चमध्ये किंचित वाढून तिमाही उच्चांकावर
cryptocurrency fraud marathi news
क्रिप्टो करंन्सीच्या नावावर युवकाने गमावले २३ लाख रुपये
12 different products in maharastra received gi tags
तुळजापूरच्या कवड्याच्या माळेसह कोणत्या उत्पादनांना मिळाले जीआय मानांकन? जाणून घ्या सविस्तर…
tuberculosis tb patients marathi news, pm narendra modi tb medicines marathi news
औषधांच्या तुटवड्यासंदर्भात क्षयरुग्णांचे पंतप्रधानांना पत्र

देशात ओमायक्रॉनचा शिरकाव ; कर्नाटकात दोन रुग्ण : भयभीत होऊ नका, नियम पाळा; केंद्राचे आवाहन

ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेला रुग्ण २० नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आला होता. यादरम्यान त्यांचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. परत आल्यावर केआयए बंगलोर येथे त्याची तपासणी व चाचणी करण्यात आली. भारतात आल्यावर त्यांनी २० नोव्हेंबरलाच एका हॉटेलमध्ये तपासणी केली. यावेळी त्यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला. UPI-IC डॉक्टरांनी तपासणीसाठी हॉटेलला भेट दिली आणि त्यांना हॉटेलमध्येच स्वत: ला वेगळे ठेवण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर २२ नोव्हेंबर रोजी त्या व्यक्तीच्या चाचणीसाठी नमुने घेण्यात आले आणि ते जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले गेले.

त्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी एका खाजगी प्रयोगशाळेत रुग्णाची करोना चाचणी करण्यात आली, ज्याचा अहवाल निगेटिव्ह आला.  २४ लोक या रुग्णाच्या संपर्कात आले होते. या सर्वांची चाचणी घेण्यात आली. सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. २२ आणि २३ तारखेला, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने २४० जणांचे नमुने घेतले, सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आले. त्यानंतर रुग्णाने २७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता हॉटेमधून चेक आउट केले. विमानतळावर कॅब घेतली आणि दुबईपर्यंत प्रवास केला.

Omicron Variant : दक्षिण अफ्रिका ते भारत… कसा पसरला ओमायक्रॉन?

नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी जीनोम सिक्वेन्सिंगनंतर, कर्नाटकमध्ये आतापर्यंत ओमायक्रॉनची दोन प्रकरणे आढळून आली आहेत अशी माहिती दिली. आपल्याला घाबरून जाण्याची गरज नाही, पण जागरूकता खूप महत्वाची आहे आणि करोनाच्या सर्व नियमांचे योग्य पालन करणे देखील आवश्यक आहे.

“धोकादायक देशांतून येणाऱ्या प्रवाशांना भारतात आल्यावर आरटी-पीसीआर चाचणी करावी लागेल. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्यांच्यावर सध्याच्या प्रोटोकॉलनुसार उपचार केले जातील. निगेटिव्ह आढळल्यास त्यांना ७ दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल. कोविडच्या ओमायक्रॉन या नवीन प्रकाराबाबत अनेक तथ्ये विज्ञानाद्वारे समोर येणार आहेत,” असे लव अग्रवाह म्हणाले.