चीनमध्ये आणखी १६ जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून बीजिंगमध्ये ५६ दिवसांनंतर करोनाची लागण झाल्याची पहिली घटना घडली आहे, असे वृत्त अधिकृत माध्यमांनी दिले आहे.
बीजिंगच्या क्षीचेंग जिल्ह्य़ात गुरुवारी एकाला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. बीजिंगमध्ये सलग ५६ दिवसांनंतर करोनाची लागण झाल्याचे आढळले आहे, असे स्थानिक महापालिकेच्या हवाल्याने एक दैनिकाने म्हटले आहे.
परदेशातून आणि अन्य शहरांमधून येणाऱ्या स्थानिकांसाठी चीन सरकारने विलगीकरणाचे नियम कडक केले आहेत. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने म्हटले आहे की, बुधवारी करोनाची लागण झालेले ११ नवे रुग्ण आढळले आणि हे सर्व परदेशातून आलेले आहेत. या ११ पैकी सहा जण शांघायमधील, तीन ग्वांगडाँगमधील आणि तिआनजीन व फुजिआनमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
