chief justice dy chandrachud
सरन्यायाधीश कोर्टात आले आणि आपली खुर्ची सोडून चक्क समोरच्या स्टूलवर जाऊन बसले; ‘या’ कृतीचं होतंय सर्वत्र कौतुक!
Sanjay Singh accused of making offensive remarks about Prime Minister Modi educational qualifications
संजय सिंह यांची याचिका फेटाळली; पंतप्रधान मोदी यांच्या पदवीबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप
navneet rana and congress candidate rashmi barve
एकाच मुद्यावरील न्यायालयाच्या निर्णयाने एक निवडणूक रिंगणात तर दुसरी रिंगणाबाहेर
Dy Chandrachud on Tamil Nadu Governor
‘तुम्ही न्यायालयाचा अवमान करत आहात’, सर्वोच्च न्यायालयाने तमिळनाडूच्या राज्यपालांना सुनावलं

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच सर्वोच्च न्यायालयात एका कृष्णवर्णीय महिलेची न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली आहे. केतनजी ब्राऊन जॅक्सन असे या महिलेचे नाव आहे. जॅक्सन या सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती झालेल्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला आहेत. जॅक्सन न्यायमूर्ती स्टीफन ब्रेयर यांची जागा घेतील. जॅक्सन यांच्या नियुक्तीमुळे आता सर्वोच्च न्यायालयात प्रथमच चार महिला न्यायमूर्ती असतील. त्यापैकी दोन कृष्णवर्णीय न्यायमूर्ती आहेत.  

अमेरिकेच्या दृष्टीने ही घटना मैलाचा दगड आणि अध्यक्ष जो बायडेन यांच्यासाठी विजयाचा क्षण असल्याचे मानले जाते. बायडेन यांनी निवडणूक प्रचारात तसे आश्वासन दिले होते, ते त्यांनी पूर्ण केले.