झुडपात पडलेल्या बॉम्बच्या स्फोटात पाच मुले जखमी

भागलपूर जिल्ह्य़ातील कथलबारी येथे झुडपात पडलेल्या एका गावठी बॉम्बचा स्फोट होऊन त्यामध्ये तेथेच खेळत असलेली पाच मुले जखमी झाली, असे पोलिसांनी सांगितले.

भागलपूर जिल्ह्य़ातील कथलबारी येथे झुडपात पडलेल्या एका गावठी बॉम्बचा स्फोट होऊन त्यामध्ये तेथेच खेळत असलेली पाच मुले जखमी झाली, असे पोलिसांनी सांगितले.
सदर परिसरात मुले क्रिकेट खेळत होती, त्यांचा चेंडू नजीकच्या झुडपात गेला. तो शोधताना तेथे पडलेल्या बॉम्बचा स्फोट झाला त्यामध्ये पाच मुले जखमी झाली, असे ज्येष्ठ पोलीस अधीक्षक विवेककुमार यांनी सांगितले.
जखमींना तातडीने जवाहरलाल नेहरू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यापैकी एका मुलाची प्रकृती चिंताजनक आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Five children injured in bhagalpur blast