नव्या स्ट्रेनमुळे चिंता, ब्रिटनहून आलेले पाच प्रवासी करोना पॉझिटिव्ह

प्रवासी आणि क्रू मेंबर्स मिळून विमानात २६६ जण होते.

ब्रिटनमध्ये करोना व्हायरसचा एक नवा स्ट्रेन सापडला आहे. या स्ट्रेनमुळे संपूर्ण जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ब्रिटनमध्ये या स्ट्रेनमुळे अनेकांना मोठया प्रमाणात करोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे तिथल्या प्रशासनाने ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन जाहीर केला आहे.

भारतासह जगातील अनेक देशांनी ब्रिटनबरोबरची हवाई सेवा स्थगित केली आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस ब्रिटनमधून एकही विमान भारतात येणार नाही आणि भारतातून एकही विमान ब्रिटनसाठी उड्डाण करणार नाही. पूर्वानुभव लक्षात घेता, खबरदारी म्हणून भारत सरकारने ही पावले उचलली आहेत.

आणखी वाचा- ब्रिटनमध्ये करोनाच्या नवीन प्रकाराचा वेगाने फैलाव होतोय, पण जीवघेणा नाही : डॉ. विवेक मूर्ती

दरम्यान काल रात्री दिल्ली विमानतळावर लँडिंग केलेल्या एका विमानातील पाच प्रवासी करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. हे प्रवासी विमान लंडनहून आले होते. एकूण २६६ प्रवासी आणि क्रू मेंबर्सपैकी पाच जणांना करोनाची बाधा झाली. या पाच प्रवाशांचे नमुने तपासणीसाठी NCDC ला पाठवण्यात आले आहेत. या प्रवाशांना केअर सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे.

आणखी वाचा- करोनाचा नवा प्रकार आढळल्यानंतर WHO कडून मोठी अपडेट; म्हणाले…

यूकेहून येणाऱ्या विमानांना निर्बंध लागू होण्याआधी दोन नियोजित विमानांपैकी एक विमानात हे करोना पॉझिटिव्ह प्रवासी आढळले. जे प्रवासी करोना पॉझिटिव्ह आहेत, त्यांच्यामध्ये नवीन स्ट्रेन आहे का? ते अजून स्पष्ट झालेले नाही. तपासणी आणि संशोधनानंतरच ते स्पष्ट होईल. लंडनमध्ये या नव्या स्ट्रेनचे अनेक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सरकारकडून सर्व आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Five flyers from uk test positive at delhi airport dmp

ताज्या बातम्या