Man attacks devotees inside Amritsar Golden Temple : पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिराच्या परिसरात शुक्रवारी एका अज्ञात व्यक्तीने रॉडने हल्ला करून पाच भाविकांना जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या हल्ल्यात भटिंडा येथील एक शीख तरुण गंभीररित्या जखमी झाला असल्याची माहिती मिळत आहे. या तरूणावर सध्या अमृतसर येथील श्री गुरु राम दास इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्चच्या एमर्जन्सी विभागात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी हल्ला करणारा आरोपी आणि त्याला घेऊन येणाऱ्याला अटक केली आहे. मात्र अद्याप हल्लेखोराचे नाव उघड करण्यात आले नाही. भाविकांवर हल्ला करणार्याबरोबर दुसर्या आरोपीने परिसराची रेकी केल्याचा आरोप आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे.
सुवर्ण मंदिराच्या व्यवस्थापनाचे काम करणाऱ्या करणाऱ्या शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने (SGPC) सांगितले की, आरोपीने अचानक रॉडने भाविकांवर हल्ला करण्यास सुरुवात केली.