फटाक्याच्या दुकानात स्फोट झाल्याने पाच जणांचा मृत्यू, २५ जण जखमी

फटाक्याच्या दुकानात स्फोट झाल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

Chennai-5
(फोटो – इंडियन एक्सप्रेस)

फटाक्याच्या दुकानात स्फोट झाल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर, २५ जण जखमी झाले आहेत. तामिळनाडूच्या कल्लाकुरिची जिल्ह्यातील शंकरपुरम शहरात मंगळवारी ही घटना घडली. फटाक्यांच्या अचानक झालेल्या स्फोटामुळे शहरात एकच खळबळ उडाली. शंकरपुरम आणि कल्लाकुरिची येथील अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली, एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले.

“दिवाळीपूर्वी शंकरपुरम येथे लावण्यात आलेल्या फटाक्यांच्या दुकानात किमान पाच जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्वजण दुकानाचे मालक आणि कामगार असल्याची शक्यता आहे. तसेच इतर २५ जण जखमी झाले आहेत. स्फोटात जखमी झालेल्या लोकांना कल्लाकुरिची येथीलसरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे,”असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी आगीच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपये आणि जखमींना १ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Five killed and 25 injured in blast at firecracker shop in kallakurichi tn hrc

Next Story
शांत व आरोग्यदायी झोपेसाठी सेंद्रिय बिछाना
ताज्या बातम्या