scorecardresearch

यालाच म्हणतात कर्माचं फळ! मंदिराला भगदाड पाहून आत शिरला; पण चोरी करुन बाहेर येताना त्यातच अडकला, वाचा नेमकं काय झालं…

आंध्र प्रदेशात घडलेली ही घटना सध्या चर्चेचा विषय ठरला आहे

मंदिराला भगदाड पाडून आत घुसून चोरी करणारा चोर त्याच भगदाडमध्ये अडकून पोलिसांच्या तावडीत सापडल्याची घटना समोर आली आहे. मंदिरात घुसून या चोराने नऊ ग्रॅम चांदीचे दागिने चोरले होते. दागिने चोरुन पुन्हा त्याच भगदाडमधून बाहेर पडत पळण्याच्या प्रयत्नात असताना मात्र त्याची फजिती झाली. आंध्र प्रदेशात घडलेली ही घटना सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. पोलिसांनी या चोराला बेड्या ठोकल्या असून चोराला मंदिरातच कर्माचं फळ मिळाल्याचं बोललं जात आहे.

श्रीकाकुलम जिल्ह्यात ही घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिरंजीवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “पापा राव असं या चोराचं नाव असून जामी एलम्मा मंदिरातील नऊ ग्रॅम चांदी त्याने चोरली होती. मंदिरात घुसण्यासाठी त्याने भिंतीला भगदाड पाडलं होतं. चोरी करुन परतत असताना तो त्या भगदाडमध्ये अडकला. यानंतर त्याला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं आणि ताब्यात घेतलं”.

मंदिराच्या मालकाने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी त्या भगदाडमधून दागिने बाहेर फेकत होता. “अशा प्रकारची घटना याआधी झालेली नाही. भगदाड पाहून तो आत शिरला आणि त्यातच अडकला. तो त्या भगदाडमधून देवीचे दागिने बाहेर फेकत होता,” अशी माहिती त्यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fleeing thief gets trapped in hole after raiding andhra temple sgy

ताज्या बातम्या