न्यूयॉर्कच्या लागुआर्डिया विमानतळावर रविवारी रात्री विमानाचा अपघात झाला. या दरम्यान जी घटना घडली ती चमत्कारापेक्षा कमी नाही. सीटबेल्ट लावलेला असतानाही कॅनडाची एक फ्लाईट अटेंडंट फ्लाईटपासून ३३० फूट अंतरावर जाऊन पडली. त्यामुळे तिचा जीव वाचला आहे. तिला जखमा झाल्या आहेत. पण तिचा जीव वाचला आहे. सोलांगे ट्रेम्बले असं या अटेंडंटचं नाव आहे. तिच्या एका पायात फ्रॅक्चर झालं आहे. त्यांच्या मुलीने साराने आई अपघातातून थोडक्यात बचावल्याची माहिती दिली आहे.
सोलांगे यांच्या मुलीने काय सांगितलं?
सोलांगे यांची मुलगी सारा लेपिनने सांगितलं की बचाव पथक जेव्हा आईजवळ पोहचलं तेव्हा ती सीट बेल्ट बांधलेल्या अवस्थेतच पडली होती. विमानाचा एवढा मोठा अपघात झाला त्यातून बचावली, ही गोष्ट एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. नेमकं हे घडलं कसं हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. पण मला पूर्ण खात्री आहे की कुणीतरी देवदूत होता ज्याने माझ्या आईचं रक्षण केलं.
विमान अपघातात पायलट आणि को पायलटचा मृत्यू
विमानाच्या या अपघातात ७२ लोक होते. या अपघातात पायलट आणि को पायलटचा मृत्यू झाला तर इतर अनेक लोक जखमी झाले. एअर कॅनडा एक्स्प्रेसचं सीआरजे ९०० विमान लागुर्डिया विमानतळावर उतरत असताना एका फायर ट्रकला धडकलं. त्यावेळी हा अपघात झाला. या अपघाताच्या वेळी फ्लाइट अटेंडंट सोलांगे त्यांच्या सीटबेल्टसह ३३० फूट लांबवर फेकल्या गेल्या. त्यांच्यावर सर्जरी करावी लागणार आहे. NDTV ने हे वृत्त दिलं आहे.
नेमकी काय घटना घडली?
लगार्डिया विमानतळावर सोमवारी एअर कॅनडाचे विमान धावपट्टी ओलांडत असलेल्या एका ट्रकला धडकल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत विमानेचे दोन्ही वैमानिक ठार झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान या अपघाताशी संबंधीत एक ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक अधिकारी अपघाताच्या काही सेकंदांपूर्वी एअर ट्राफीक कंट्रोलर ट्रक चालकाला कथितपणे थांबण्यास सांगताना ऐकू येत आहे. व्हारल होत असलेल्या ऑडिओ क्लीपमध्ये हा अधिकारी, “ट्रक १ आणि कंपनी लागार्डिया टॉवर हे डेल्टा येथील ४ क्रॉस (रनवे) करण्याची परवानगी मागत आहेत,” असे म्हणताना ऐकू येत आहे. Flightradar24 ने दिलेल्या माहितीनुसार हे विमान मॉन्ट्रियलहून आलेले CRJ-900 हे विमान ताशी सुमारे २४ मैल (३९ किमी) वेगाने त्या वाहनाला धडकले. हे विमान एअर कॅनडाची प्रादेशिक भागीदार असलेल्या जॅझ एव्हिएशन (Jazz Aviation) या कंपनीचे आहे.
