scorecardresearch

पूरग्रस्त पाकिस्तानची जगाला मदतीची हाक ; आतापर्यंत एक हजार मृत्युमुखी

पाकिस्तानात आलेल्या महापुरात आतापर्यंत एक हजारपेक्षा जास्त नागरिक मृत्युमुखी पडले आहेत.

पूरग्रस्त पाकिस्तानची जगाला मदतीची हाक ; आतापर्यंत एक हजार मृत्युमुखी
पाकिस्तानच्या दक्षिण आणि नैऋत्येकडील विस्तीर्ण सखल भागास या पुराचा मोठा फटका बसला आहे.

इस्लामाबाद, : पाकिस्तानात आलेल्या महापुरात आतापर्यंत एक हजारपेक्षा जास्त नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. गेल्या २४ तासांत पुराशी संबंधित दुर्घटनांत ११९ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या हजारांपेक्षा जास्त झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रशासकीय अधिकारी या नुकसानाचा अंदाज लावत आहेत, या संकटात अब्जावधीचे नुकसान झाल्याचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सांगितले. पाकिस्तान या संकटावर मात करण्यासाठी जागतिक मदतीसाठी आवाहन करणार आहे.

पाकिस्तानला सोळा कोटी डॉलरची मदत करण्याचे आवाहन संयुक्त राष्ट्रांतर्फे आंतरराष्ट्रीय स्तरावर ३० ऑगस्टला करण्यात येण्याची अपेक्षा आहे.

१४ जूनपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र हाहा:कार उडाला आहे. पाकिस्तानच्या दक्षिण आणि नैऋत्येकडील विस्तीर्ण सखल भागास या पुराचा मोठा फटका बसला आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाने रविवारी सांगितले, की आतापर्यंत पाकिस्तानमध्ये एक हजार ३३ नागरिक पुरात आणि पुरामुळे झालेल्या दुर्घटनांत मृत्युमुखी पडले असून, एक हजार ५२७ जण जखमी झाले आहेत. गेल्या २४ तासांत सिंध प्रांतात सर्वाधिक ७१ मृत्यू झाले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या