बंगळूरु : गेल्या पाच दिवसांपासून पूरसंकटाचा सामना करणाऱ्या बंगळूरुतील रहिवाशांना गुरुवारी काहीसा दिलासा मिळाला. शहरातील काही भागांत पुराचे पाणी कमी झाले आहे. मात्र या शहरातील वाईट परिस्थिती अद्याप संपलेली नाही. हवामान विभागाने पुढील दोन दिवस बंगळूरुसह दक्षिण कर्नाटकात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभाकाकडून मिळालेल्या माहितीनुसार ८ ते १० सप्टेंबरदरम्यान कर्नाटक राज्यातील किनारपट्टी आणि दक्षिण कर्नाटकात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्याचे वन, अन्न व नागरीपुरवठामंत्री उमेश कट्टी यांच्या निधनामुळे कर्नाटकात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे तीन दिवस कोणतेही अधिकृत कार्यक्रम होणार नाहीत. परंतु पूर व्यवस्थापनाशी संबंधित कामे आणि अन्य आपत्कालीन कामे सुरू असतील, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी गुरुवारी सांगितले.

pune rain marathi news, rain predictions pune marathi news
पुण्यात कुठे, किती पडला पाऊस? पावसाचा अंदाज काय?
imd predicted hailstorm in north central Maharashtra
उत्तर-मध्य महाराष्ट्र,मराठवाड्यात शुक्रवारी गारपीट… जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज
Temperature in Mumbai today and tomorrow at 37 degrees
मुंबईतील तापमानाचा पारा आज, उद्या ३७ अंशावर
Unseasonal rain Buldhana district
बुलढाणा जिल्ह्यावर निसर्ग कोपला! गारपीटसह अवकाळीचे थैमान; रब्बी पिकांची प्रचंड हानी

मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांगितले की, त्यांचे सरकार बंगळूरु शहर आणि आसपासच्या परिसरातील वाहतुकीच्या समस्या सोडवण्यासाठी कृती आराखडा लागू करणार असून त्यासाठी प्राधिकरण तयार करण्यात येणार आहे. दोन दिवसांच्या मुसळधार पावसानंतर बंगळूरुच्या काही भागांत हाहाकार माजला असताना मुख्यमंत्र्यांचे विधान आले आहे. बंगळूरुमध्ये ‘भारतमाला’ मालिकेअंतर्गत दोनदिवसीय ‘मंथन’ कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी शहरात आलेले केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्याशी झालेल्या भेटीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

काँग्रेसची भाजपवर टीका

बंगळूरुतील पुराला काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केल्यानंतर विरोधी पक्षनेते सिद्धरमय्या यांनी पलटवार केला आहे. सत्ताधारी भाजप आपले अपयश लपवण्यासाठी बंगळूरुमधील दुर्दशेला काँग्रेसला जबाबदार धरत आहेत. आपली जबाबदारी झटकण्याचा हा प्रयत्न आहे. पुराचे पाणी वाहून नेण्यासाठी बांधलेल्या नाल्यांच्या सफाईसाठी आणि त्यांवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी त्यांनी केली.