मालदीवचे माजी उपराष्ट्रपती अहमद अदीब ताब्यात

भारतात बेकायदेशीररित्या प्रवेश करताना कारवाई ; परराष्ट्र मंत्रालय घटनेची शहानिशा करणार

मालदीवचे माजी उपराष्ट्रपती अहमद अदीब अब्दुल गफूर यांना भारतात बेकायदेशीर पद्धतीने प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना तामिळनाडूतील तूतीकोरिन येथे घडली. अहमद अदीब यांना तूतीकोरिन बंदरावर त्यावेळी ताब्यात घेण्यात आले, जेव्हा ते भारतात बेकायदेशीरिरत्या प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते, असे भारतीय तपास संस्थांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

अदीब यांना आयबीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयास याबाबत माहिती दिल्या गेली. यानंतर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी म्हटले की, आम्ही या घटनेची सत्यता पडताळून पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही त्यांच्या सरकारशी संपर्क साधू व जाणून घेऊ की ही बातमी खरी आहे की नाही.

अदीब हे “विर्गो 9” या बोटीद्वारे भारतीय किनाऱ्यावर पोहचे होते. यामध्ये जवळपास १० जण होते. सध्या त्यांना कुठे ठेवण्यात आले आहे याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: For illegally entering india maldives former vice president arrested in tuticorin msr

ताज्या बातम्या