केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांचं अमेरिका-पाकिस्तानमधील संबंधांवर प्रश्चचिन्ह, अमेरिकेला दिला सल्ला | Loksatta

कुणाला मूर्ख बनवताय? पाकिस्तानला लढाऊ विमानं देण्यावरून परराष्ट्र मंत्र्यांचा अमेरिकेला खडा सवाल

केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांचं अमेरिका-पाकिस्तानमधील संबंधांवर प्रश्चचिन्ह, अमेरिकेला दिला सल्ला

कुणाला मूर्ख बनवताय? पाकिस्तानला लढाऊ विमानं देण्यावरून परराष्ट्र मंत्र्यांचा अमेरिकेला खडा सवाल
केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांचं अमेरिका-पाकिस्तानमधील संबंधांवर प्रश्चचिन्ह (File Photo: PTI)

केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी अमेरिका-पाकिस्तानमधील संबंधांवर प्रश्चचिन्ह उपस्थित केलं आहे. पाकिस्तानशी असलेल्या संबंधांमुळे अमेरिकेचा कोणताही फायदा झाला नसल्याचं ते म्हणाले आहेत. “या संबंधांतून ना पाकिस्तानचं हित झालं आहे, ना अमेरिकेचा फायदा झाला आहे,” असं एस जयशंकर म्हणाले आहेत. रविवारी वॉशिंग्टनमध्ये भारतीय-अमेरिकी समुदायासाठी आयोजित कर्यक्रमात ते बोलत होते.

एस जयशंकर यांना अमेरिकेने पाकिस्तानला एफ-१६ विमानांच्या ताफ्यासाठी ४५० दशलक्ष डॉलर्सचं पॅकेज दिल्यासंबंधी प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी त्यांनी अमेरिका आणि पाकिस्तानमधील संबंध असे आहेत, ज्यामधून ना पाकिस्तानला फायदा होत आहे, ना अमेरिकेचे हित होत आहे असं म्हटलं.

हेही वाचा – राजस्थानमध्ये ९० आमदारांनी राजीनाम्याची धमकी दिल्यानंतर अशोक गेहलोतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “आता तर…”

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनीदेखील अमेरिकेच्या सुरक्षा सचिवांकडे हा मुद्दा उपस्थित केला असून, चिंता व्यक्त केली आहे. “या संबंधाचे काय फायदे आहेत आणि त्यातून काय फायदा होतो याचा विचार अमेरिकेने करायला हवा,” असा सल्ला एस जयशंकर यांनी दिला आहे.

पुढे ते म्हणाले “एकीकडे दहशतवादाविरोधात कारवाई करण्यासाठी आपण हे करत आहोत असं सांगायचं आणि दुसरीकडे एफ-१६ सारखी लढाऊ विमानं कुठे आणि कशासाठी दिली जात आहेत हे सर्वांनाच माहिती आहे. अशो गोष्टी सांगून तुम्ही इतरांना मूर्ख बनवत नाही आहात”.

“अमेरिकेची धोरणं तयार करणाऱ्यांशी बोलण्याची संधी मिळाली, तर मी नक्कीच त्यांना ते काय करत आहेत हे दाखवून देईन,” असंही ते म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
तालिबानींनी तुरुंगात डांबून आमचे केस कापले; ५५ शिखांचे अफगाणिस्तानातून भारतात आगमन

संबंधित बातम्या

VIDEO: “त्याने आमच्या बहिणीचे ३५ तुकडे केले, आम्ही त्याचे…” आफताबच्या वाहनावर तलवारीने हल्ला करणाऱ्या व्यक्तीची धमकी
हायकोर्ट नगर रचनाकार आहे का? सर्वोच्च न्यायालयाची उच्च न्यायालयाच्या ‘त्या’ आदेशाला स्थगिती
आफताबवर तलवारीने हल्ला का केला? हिंदू सेनेचा कार्यकर्ता म्हणाला, “आम्ही त्याला फाडून…”
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डींच्या बहिणीला तेलंगणात अटक, गाड्यांचीही जाळपोळ; काय आहे प्रकरण?
VIDEO: धक्कादायक! श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताबवर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न

व्हिडिओ

ताज्या बातम्या
सुरतमध्ये रोड शोवरील दगडफेकीनंतर केजरीवालांचा भाजपावर हल्लाबोल; म्हणाले, “२७ वर्षे काम केलं…”
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महिला पोलीस निरीक्षकासह पतीच सापळ्यात अडकला; औरंगाबाद येथील पथकाची कारवाई
बाईक टॅक्सी ॲपवर १० डिसेंबरपर्यंत कारवाई करण्याचे आश्वासन; पुण्यातील रिक्षाचालकांचा बंद अखेर मागे
“हा प्रोपगंडा आणि वल्गर चित्रपट…” IFFI मध्ये मुख्य ज्यूरींनीच साधला ‘द काश्मीर फाईल्स’वर निशाणा
VIDEO: “त्याने आमच्या बहिणीचे ३५ तुकडे केले, आम्ही त्याचे…” आफताबच्या वाहनावर तलवारीने हल्ला करणाऱ्या व्यक्तीची धमकी