आसामचे माजी मुख्यमंत्री तरूण गोगोई यांचे गुवहाटी येथे आज(२३ नोव्हेंबर) सायंकाळी निधन झाले आहे. ते ८४ वर्षांचे होते. राज्याचे आरोग्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी याबाबत माहिती दिली आहे. आज तरूण गोगोई यांची प्रकृती अतिशय खालवली होती. त्यांच्यावर गुवाहाटी येथील रुग्णालयात उपचार सुरू होते.

त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आपला नियोजित कार्यक्रम रद्द दिब्रुगढ येथून ते गुवाहाटी येथे निघाले होते. त्यांनी ट्विटकरून याबाबत माहिती दिली होती.

तसेच, मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल म्हणाले होते की, तरूण गोगोई माझ्या वडिलांसमान आहेत. मी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करतो आहे. ”सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून मी दिब्रुगढ येथून गुवाहाटीला जात आहे, जेणेकरून तरूण गोगोई व त्यांच्या कुटुंबासोबत राहता येईल, कारण माजी मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडली आहे.” असं त्यांनी ट्विट केलं होतं.