भाजपाचे माजी मंत्री रजिंदरपाल सिंग भाटिया यांची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

राजिंदरपाल सिंह भाटिया खुज्जी विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते.

भाजपाचे जेष्ठ नेते व खुज्जी विधानसभा मतदार संघाचे माजी मंत्री रजिंदरपाल सिंग भाटिया यांनी रविवारी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. राजिंदरपाल सिंग भाटिया खुज्जी विधानसभा मतदारसंघातून  तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार रजिंदरपाल सिंग भाटिया हे आपल्या लहान भावासोबत छुरिया भागात राहत होते.रविवारी संध्याकाळी ते एकटेच घरी होते. कुटुबांतील सदस्य जेव्हा घरी पोहचले तेव्हा ते गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आले. या सर्व घटनेची महिती पोलिसांना देण्यात आली.   सुत्रांच्या माहीतीनुसार ते गेल्या काही दिवसापासून आजारी होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Former bjp minister rajinderpal singh bhatia commits suicide by hanging himself at his residence akp