माजी महालेखापाल विनोद राय यांनी मागितली संजय निरुपम यांची माफी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

निरुपम यांनी २०१४ मध्ये राय यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता

माजी नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG) विनोद राय यांनी २ जी स्पेक्ट्रम वाटप प्रकरणात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे नाव CAG अहवालात समाविष्ट करू नये, अशी विनंती काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केल्याचा उल्लेख केला होता. याबाबत त्यांनी बिनशर्त माफी मागितली आहे. राय यांनी त्यांच्या पुस्तकात देखील निरुपम यांच्या नावाचा उल्लेख त्या खासदारांसोबत केला होता ज्यांनी कॅगच्या अहवालात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे नाव न घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला होता. 

निरुपम यांनी २०१४ मध्ये राय यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. पटियाला हाऊस येथील मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने राय यांचा माफीनामा स्वीकारत निरुपम यांचे म्हणणे नोंदवले आणि हे प्रकरण निकाली काढले. त्याचवेळी, यूपीए सरकारच्या २ जी आणि कोळसा खाण वाटपाबाबतच्या सर्व खोट्या अहवालांसाठी राय यांनी देशाची माफी मागितली पाहिजे, असेही निरुपम म्हणाले.

राय यांनी न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपण अनवधानाने आणि चुकीच्या पद्धतीने निरुपम यांच्या नावाचा उल्लेख केल्याचे म्हटले आहे.  विनोद राय यांनी असेही म्हटले आहे की, मी निरुपम यांच्या विरोधात जी विधाने केली होती, जी टीव्हीवर दिसली आणि प्रसिद्ध झाली, ती ‘वस्तूत: चुकीची’ आहेत. मला आशा आहे की संजय निरुपम माझ्या बिनशर्त माफीचा विचार करतील, ते स्वीकारतील आणि हे प्रकरण बंद करतील.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Former cag vinod rai apologizes to sanjay nirupam find out the whole case srk

Next Story
बराक ओबामा यांची रोम्नींवर टीका
ताज्या बातम्या