लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा भाजप सोडण्याचा निर्णय

गेल्या निवडणुकीत त्यांचा साप्ते यांनी पराभव केला होता

(संग्रहित छायाचित्र)

पणजी: भाजपने उमेदवारी नाकारल्याने गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पक्षाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. ६५ वर्षीय पार्सेकर जाहीरनामा समितीचे अध्यक्ष होते. मांद्रे मतदारसंघात भाजपने दयानंद साप्ते यांना उमेदवारी दिल्याने पार्सेकर नाराज आहेत. या मतदारसंघातून ते २००२ ते १७ या कालावधीत ते आमदार होते.  गेल्या निवडणुकीत त्यांचा साप्ते यांनी पराभव केला होता. मात्र २०१९ मध्ये साप्ते यांनी इतर नऊ जणांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सध्या मी पक्ष सोडणार आहे, पुढे काय करायचे हे लवकरच जाहीर करू असे पार्सेकर यांनी नमूद केले. मांद्रे मतदारसंघातील भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना साप्ते दुय्यम वागणूक देत असल्याचा आरोप पार्सेकर यांनी केला. पार्सेकर हे २०१४ ते १७ या काळात गोव्याचे मुख्यमंत्री होते. मनोहर पर्रिकर केंद्रात संरक्षणमंत्री म्हणून गेल्यानंतर राज्याची धुरा पार्सेकर यांच्याकडे सोपवण्यात आली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Former chief minister of goa laxmikant parsekar decision to leave bjp akp

Next Story
नरेंद्र मोदी हे जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी