माजी मुख्यमंत्री आणि कर्नाटकचे विरोधी पक्षनेते सिद्धारमय्या विधानसभेत भाषण देत असताना त्यांचं धोतर सुटलं. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सिद्धारमय्या यांच्यासह विधानसभेतील उपस्थितांमध्ये हशा पिकला. तर, करोनामुळे वजन वाढल्यानं धोतर कंबरेवर राहत नसल्याचं सिद्धारमय्या म्हणाले. कर्नाटकचे विरोधी पक्षनेते सिद्धारमय्या विधानसभेत म्हैसुर बलात्कार प्रकरणावर बोलत होते.

यावेळी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी त्यांच्याजवळ येत त्यांना अडवले आणि त्यांच्या कानात सांगितले की, त्यांचं सुटलंय आणि खाली पडेल. यावर सिद्धारमय्या “अरे, असं आहे का?” म्हणत जागेवर बसले. आणि मी धोतर बांधल्यानंतर भाषण पुन्हा चालू करेल, असं म्हणाले. तसंच करोनातून बरं होताना माझं ४-५ किलो वजन वाढलंय. त्यामुळे पोट मोठं झालंय आणि धोतर लहान व्हायला लागलंय. त्यामुळे धोतर कंबरेवर राहत नाही, असंही सिद्धारमय्या यांनी सभागृहात सांगितलं. त्यानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला.

Sonia Gandhi Sharad Pawar Uddhav Thackeray will enjoy family happiness after election says Dr Dinesh Sharma
सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांना निवडणुकीनंतर पारिवारिक सुख उपभोगता येईल- डॉ. दिनेश शर्मा
cm siddaramaiah
कर्नाटकात ५० खोके प्रयोग; मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपावर केला खळबळजनक आरोप
Thackeray group, Gaikwad,
कल्याणमध्ये ठाकरे गट आणि गायकवाड समर्थक छुप्या युतीच्या चर्चा ? भाजप आमदारांचा शिंदेंना पाठींबा, आमदार पत्नी मात्र ठाकरेंच्या उमेदवारासोबत
Shrikant Shinde
कल्याणमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; भाजपा कार्यकर्त्यांवरही टीका, म्हणाले…

पुढे मंत्री के एस ईश्वरप्पा यांना आवाज देत ते म्हणाले, “ईश्वरप्पा माझं धोतर पडलंय. माझं पोट वाढलंय, त्यामुळे माझं धोतर सतत खाली पडतंय. तर यावेळी ट्रेजरीमध्ये बसलेल्या कोणीतरी त्यांना मदतीची ऑफर दिली. तेव्हा सिद्धरामय्या म्हणाले, “तुम्ही दुसऱ्या बाजूला बसलेला आहात, त्यामुळे मी तुमच्याकडे मदत मागणार नाही.”

याबद्दल काँग्रेसचे आमदार रमेश कुमार म्हणाले, “आमचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी त्यांची आणि पक्षाची प्रतिमा वाचवण्यासाठी सिद्धरामय्या यांच्या कानात सांगितलं. पण सिद्धरामय्या यांनी संपूर्ण सभागृहात त्याची घोषणा केली. त्यामुळे आता भाजपचे लोक त्यांच्या आणि पक्षाच्या प्रतिमेला डाग लावण्याची वाट पाहत असतील.” यावर सिद्धरामय्या म्हणाले, की “भाजपा असा प्रयत्न नक्कीच करू शकते पण ते आमच्या प्रतिमेला काहीही करू शकत नाहीत.”