गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल यांना भाजपने निवडणुकीत उमेदवारी नाकारली आहे़  उत्पल हे इच्छुक असलेल्या पणजी मतदारसंघातून भाजपने बाबूश मॉन्सेरात यांना उमेदवारी दिली़  यामुळे उत्पल हे काय निर्णय घेणार, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे़

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने गुरुवारी ३४ उमेदवारांची यादी जाहीर केली़  त्यात उत्पल पर्रिकर यांना स्थान मिळालेले नाही़  उत्पल यांनी पणजी मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा जाहीरपणे व्यक्त केली होती़  मात्र, त्यांच्याऐवजी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या बाबूश यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली़ त्यामुळे उत्पल हे अस्वस्थ असून, लवकरच भूमिका जाहीर करेन, असे त्यांनी स्पष्ट केले़   उत्पल यांना भाजपने अन्य दोन मतदारसंघांचे पर्याय दिले होते़  मात्र, त्यांना ते अमान्य आहेत़  त्यामुळे ते बंड करून पणजीमधूनच निवडणूक लढविण्याची शक्यता आहे़ 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former goa chief minister manohar parrikar son utpal bjp elections candidacy rejected akp
First published on: 21-01-2022 at 01:47 IST