माजी पोलीस अधिकारी तथा भाजपच्या ज्येष्ठ नेत्या किरण बेदी यांची काँग्रेसने सत्ता मिळवलेल्या पुदुचेरीच्या नायब राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
नुकत्याच झालेल्या पाच विधानसभा निवडणुकांमध्ये आसाम वगळता इतर राज्यांमध्ये भाजपला रोखत प्रादेशिक पक्षांनी सत्ता मिळवली. त्यामध्ये पुदुचेरीमध्ये काँग्रेस-द्रमुक आघाडीने ३० पैकी १७ जागा जिंकून जयललिता यांच्या अण्णा द्रमुकचा दारुण पराभव केला. पुदुचेरीमध्ये खातेही खोलता न आलेल्या भाजपने आता किरण बेदी यांना तिथे राज्यपाल म्हणून नियुक्त केले आहे. यापूर्वी, लेफ्ट. जनरल ए. के. सिंग हे पुदुच्चेरीचे प्रभारी नायब राज्यपाल म्हणून पदभार सांभाळत होते. त्यांच्याकडे आता अंदमान आणि निकोबारचा पदभार आहे.
किरण बेदी यांच्‍या या निवडीवर आप नेता कुमार विश्वास यांनी ट्विटरवरून टीका केली की, ”वो जो फिरता था लिए हाथ में सूरज कल तक, आज ख़ैरात में जुगनू बटोर कर ख़ुश है।”. दरम्‍यान मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्‍यांचे अभिनंदन केले.

CM Eknath Shinde On Mahavikas Aghadi
“विखे पाटलांची मुळं इतकी खोलवर आहेत, की मविआचं वरून कुणी आलं तरी…”, एकनाथ शिंदेंचा नगरमधून हल्लाबोल!
Ajit Pawar On Navneet Rana
“नवनीत राणा यांच्या विजयासाठी…”; उपमुख्यमंत्री अजित पवार चुकून काय म्हणाले?
BJP leader conspiracy behind Arvind Kejriwal arrest
केजरीवालांच्या अटकेमागे भाजप नेत्याचे कारस्थान! संजय सिंह यांचा आरोप
mla ram satpute slam sushilkumar shinde over development
सोलापूरच्या पूर्वीच्या नेतृत्वाने ७५ वर्षांच्या विकासाचा हिशेब द्यावा; आमदार राम सातपुते यांचे सुशीलकुमार शिंदे यांना आव्हान