पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांना अटक करण्यात आली आहे. नॅशनल अकाऊंटॅबिलिटी ब्युरोच्या १२ जणांच्या पथकाने अब्बासी यांना अटक केली आहे. २२० कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

याआधी पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनाही आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी NAB ने अटक केली आहे. आता माजी पंतप्रधानांनाही अटक करण्यात आली आहे. खाकान यांच्यावर ते पंतप्रधान असताना अतिरिक्त खर्च केल्याचाही ठपका ठेवण्यात आला आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये ज्यांनी ज्यांनी पाकिस्तानात सत्ता असताना अतिरिक्त खर्च केला त्यांच्याकडून ती रक्कम वसूल केली जाईल असा ठराव पाक सरकारने केला आहे. त्याचमुळे खाकान अब्बासी यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.