माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न बहाल करण्यात आल्यानंतर काही तासांतच राष्ट्रीय लोक दलाचे प्रमुख जयंत चौधरी यांनी शुक्रवारी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशमध्ये भाजपबरोबरच्या युतीची घोषणा केली. “मी युतीबरोबरची ऑफर नाकारू शकत नाही, अशी प्रतिक्रिया जयंत चौधरी यांनी दिली. जयंत चौधरी हे चौधरी चरणसिंग यांचे नातू आहेत.

“आता मी ऑफर कशी नाकारू? आतापर्यंतचा कोणताच पक्ष जे करू शकला नाही ते मोदीजींच्या व्हिजनने केले आहे”, असंही ते म्हणाले. तसंच, आज आनंदाचा दिवस असल्याने जागावाटपासंदर्भात बोलण्याची वेळ नाही, असंही ते म्हणाले. या युतीत आरएलडीचा समावेश झाल्याने इंडिया आघाडीला धक्का बसला आहे.

Akhilesh Mishra
आयर्लंडमधील भारताचे राजदूत अखिलेश मिश्रांना पदावरुन हटवा; काँग्रेसने का घेतली आक्रमक भूमिका?
birendra singh
सर्व दहा जागा राखण्याचे हरियाणात भाजपपुढे आव्हान
aap party leader aatishi
‘आप’च्या नेत्या आतिशी यांना नोटीस; भाजपवर केलेल्या आरोपांबाबत उत्तर देण्याचे निर्देश
Pappu Yadav’s claim on Purnea
पप्पू यादव पूर्णियातून लढण्यावर ठाम; काँग्रेस-राजदमधील जागावाटपाचा तिढा सुटेना

हेही वाचा >> Bharat Ratna Awards 2024 : माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव, चौधरी चरण सिंह आणि एम.एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न जाहीर

“मुख्य प्रवाहाचा भाग नसलेल्या लोकांना प्रोत्साहन दिल्याबद्दल मी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींच्या सरकारचे आभार मानू इच्छितो. हा एक मोठा दिवस आहे… आणि एक माझ्यासाठी भावनिक क्षण”, चौधरी म्हणाले. “मला राष्ट्रपती (द्रौपदी मुर्मू), (भाजप) सरकार आणि पंतप्रधान मोदी यांचे आभार मानायचे आहेत… तीन (भारतरत्न) पुरस्कार देण्यात आले आहेत. या निर्णयाशी लोकांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत.”

आरएलडीला मिळणार दोन जागा?

आगामी लोकसभा निवडणुकीत आरएलडीला दोन जागा मिळणार असल्याची चर्चा आहे. उत्तर प्रदेशात बागपत आणि बिजनौर या दोन जागा आरएलडी लढवणार असून त्यांना राज्यसभेच्याही जागा देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचंही वृत्त आहे. जयंत चौधरी यांच्या आरएलडीचा पश्चिम उत्तर प्रदेशात प्रभाव आहे. या भागात जाट समुदायाचं वर्चस्व आहे. त्यामुळे येथे भाजपाला फायदा होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >> “भाजपाने राजकीय औदार्य दाखवलंच आहे तर…”, भारतरत्न पुरस्कारांवरून राज ठाकरेंची रोखठोक भूमिका

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपने गमावलेल्या १६ जागांपैकी सात पश्चिम उत्तर प्रदेशातील होत्या. मुरादाबादातील सर्व सहा जागा गमावल्या होत्या.उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीत जागावाटपावरून मतभेद असताना हा ही युती झाली आहे. काँग्रेस आणि समाजवादी पक्ष (एसपी) यांच्यातही जागावाटपाच्या चर्चेत कोणतीही प्रगती झालेली नाही. त्यामुळे ही युती इंडिया आघाडीला महागात पडण्याची शक्यता आहे.