scorecardresearch

पंजाब माजी प्रदेशाध्यक्ष जाखड यांचा काँग्रेस सोडण्याचा निर्णय

पंजाबमधील काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनीलकुमार जाखड यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय शनिवारी जाहीर केला.

UP Elections Results 2022 yogi adityanath will create history by breaking these several record

पीटीआय, चंडीगड : पंजाबमधील काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनीलकुमार जाखड यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय शनिवारी जाहीर केला. पक्षविरोधी कारवाया केल्याने त्यांना याआधीच पक्षाच्या विविध पदांवरून हटवण्यात आले होते. 

काँग्रेसचे सध्या उदयपूर (राजस्थान) येथे चिंतन शिबिर सुरू असताना असंतुष्ट जाखड यांनी काँग्रेस सोडण्याची घोषणा केली. आपल्या फेसबुक पेजवरून थेट प्रक्षेपणाद्वारे त्यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले, ‘‘मी काँग्रेसला पक्षत्यागाची भेट देत आहे. गुड लक आणि गुड बाय काँग्रेस!’’ काँग्रेसने जाखड यांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावल्याने ते अस्वस्थ होते. त्यांच्याविरुद्ध पक्षविरोधी कारवाया केल्याच्या तक्रारी असल्याने पक्षाने त्यांना सर्व पदांवरून मुक्त केले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Former punjab state president decides quit congress anti of the party ysh

ताज्या बातम्या