scorecardresearch

मुलायम सिंह यादव यांची प्रकृती बिघडली; अतिदक्षता विभागात उपचार सुरू

गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात सुरू आहेत उपचार; अखिलेश यादव लखनऊहून रवाना

मुलायम सिंह यादव यांची प्रकृती बिघडली; अतिदक्षता विभागात उपचार सुरू
(संग्रहित छायाचित्र)

समाजवादी पार्टीचे (सपा) अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांची प्रकृती आज (रविवार) अचानक बिघडल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जिथे डॉक्टर मुलायम सिंह यादव यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहेत. आज तब्येत बिघडल्याने त्यांना आता अतिदक्षता विभागात (आयसीयू) मध्ये हलवण्यात आले आहे.

वडिलांची प्रकृती बिघडल्याचे समजताच अखिलेश यादव हे लखनऊहून दिल्लाकडे रवाना झाले आहेत. तर मुलायम सिंह यांचा दुसरा मुलगा प्रतीक यादव आणि धाकटा भाऊ शिवापल सिंह हे आधीच दिल्लीत आहेत.

याशिवाय त्यांची सून अपर्णा यादव या देखील दिल्लीला रवाना झाल्या आहेत. मुलायम सिंह यादव यांच्यावर डॉ. सुशीला काटरिया यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. याशिवाय, मेदांताचे वरिष्ठ डॉक्टर नरेश त्रेहान हे स्वत: त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या