सध्या जग उर्जा संकटाचा सामना करत आहे. मात्र, त्याला पर्याय म्हणून आपण अक्षय ऊर्जेचा वापर करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन युनायटेड नेशन्सचे (UN) सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी केलं आहे. जागतिक हवामान संघटनेने सादर केलेल्या अहवालानंतर गुटेरेसे यांनी हे मत व्यक्त केले आहे.

हरितगृह वायू उत्सर्जनावर अंकुश ठेवण्याची कृती अतिशय संथ असल्याने जग आपत्तीकडे जात असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंटोनिया गुटेरेस यांनी दिला. अक्षय ऊर्जेतील खाजगी आणि सार्वजनिक गुंतवणूक दरवर्षी किमान $4 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत तिप्पट झाली पाहिजे असेही गुटेरेस म्हणाले.

जागतिक हवामान संघटनेने अहवाल सादर केला होता. त्यानुसार २०२१ मध्ये समुद्राच्या पातळीत वाढ झाली असून समुद्रातील उष्णता, हरितगृह वायूंचे प्रमाण आणि महासागरातील आम्लीकरणामुळे हवामानावर भयानक परिणाम झाले आहेत. जागतिक ऊर्जा प्रणाली कोलमडलेली असल्याचेही गुटेरेस म्हणाले. तसेच युक्रेनमधील युद्धाचा उर्जा किंमतीवर परिणाम होत आहे. जीवाश्म इंधनांच्या साठा संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे अक्षय उर्जा हे एकच शाश्वत भविष्य असल्याचे गुटेरेस म्हणाले.