भीमबेर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून प्रचंड गोळीबार; ४ जवान शहीद, १ गंभीर जखमी

राजौरीत पाकने पुन्हा केले शस्त्रसंधीचे उल्लंघन

छायाचित्र प्रातिनिधीक

गेल्या काही दिवसांच्या शांततेनंतर रविवारी पुन्हा एकदा पाकिस्तानने जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील भीमबेर आणि मंझाकोट सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. यात एका अधिकाऱ्यासह ३ जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे. तर इतर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, शहीदांमध्ये एका कॅप्टनचाही समावेश आहे. अजूनही या भागात गोळीबार सुरुच आहे.


शहीद जवानांमध्ये कॅप्टन कपील कूंडू, जवान राम अवतार, जवान शुभम सिंह आणि जवान रोशन लाल यांचा समावेश आहे. तर, लांस नायक इकबाल अहमद हे यात गंभीर जखमी झाले आहेत.

भारतीय सैन्याकडूनही पाकिस्तानच्या या गोळीबाराला सडेतोड उत्तर देण्यात आले आहे. दरम्यान, आजच सकाळी पाकिस्तानकडून पुंछ जिल्ह्यातील शाहपूर सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणावर गोळीबार करण्यात आला होता. यात एका स्थानिक १५ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Four army soldiers have lost their lives in ceasefire violation by pakistan in rajouri sector

ताज्या बातम्या