Bomb Threats to 85 Flights : देशात विमान कंपन्यांना येणाऱ्या धमक्या पाहून नेमकं चाललं तरी काय आहे? असा प्रश्न कुणालाही पडेल. कारण आता एक नाही दोन नाही ८५ विमानं बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. यामध्ये इंडिगोची २० विमानं, एअर इंडियाची २०, विस्ताराची २० आणि अकासा एअरलाइन्सची २५ अशी ८५ विमानं उडवून देण्यात येतील अशी धमकी देण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागच्या आठ दिवसात ९० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानं बॉम्बने उडवण्याची धमकी आली आहे. यानंतर दिल्ली पोलीस अलर्ट मोडवर आहेत.

कुठल्या कंपन्यांच्या विमानांना धमकी?

अकासा, एअर इंडिया, इंडिगो, विस्तारा या विमान कंपनीची विमानं बॉम्बने उडवू अशी धमकी देण्यात आली आहे. या धमकी प्रकरणात आत्तापर्यंत आठ वेगवेगळ्या FIR दाखल करण्यात आल्या आहेत. दिल्लीहून देशातल्या विविध ठिकाणी जाणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय विमानांना ही धमकी देण्यात आली आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हे पण वाचा- दहशतवादी पन्नूकडून भारतीय विमान बॉम्बने उडवण्याची धमकी, तारीखही सांगितली; आंतरराष्ट्रीय प्रवाशांना म्हणाला…

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने काय माहिती दिली?

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार धमक्यांचे हे संदेश सुरुवातीला एक्स या मायक्रोब्लॉगिंग साईटवर देण्यात आले. ते सुरुवातीला तपास अधिकाऱ्यांनी फेटाळले. यातलं पहिलं प्रकरण १६ ऑक्टोबरला समोर आलं होतं. मात्र आता ८५ विमानं उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे तपास यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत.

१६ ऑक्टोबरला काय घडलं?

१६ ऑक्टोबरला अकासा एअरलाइनचं विमान हे बॉम्बने उडवण्यात येईल अशी धमकी एक्सवरुन देण्यात आली होती. १८० प्रवासी या विमानात बसले होते. ही धमकी आल्यानंतर हे विमान पुन्हा दिल्ली विमानतळावर उतरवण्यात आलं होतं. तसंच पोलिसांनी एक्सकडे पत्र लिहून ही धमकी कुठल्या अकाऊंटवरुन आली त्याचे तपशील मागितले होते.

दिल्लीचा सायबर सेल विभाग दक्ष

दिल्ली पोलिसांचा साबयर सेल विभाग सध्या या प्रकारच्या घटनांवर लक्ष ठेवून आहे. एक्स आणि सोशल मीडियाचा वापर करुन विमानं उडवण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत. एका आठवड्यात १७० हून अधिक विमानं उडवू, त्या विमानांमध्ये स्फोट करु अशा धमक्या आल्या आहेत. एखाद्या एक्स अकाऊंटवरुन धमक्या येत तर नाहीत ना? याकडे डोळ्यांत तेल घालून सायबर सेल विभाग लक्ष देत आहे. या धमक्या का देण्यात येत आहेत? कुणाकडून देण्यात येत आहेत याचे तपशील अद्याप समजू शकलेले नाहीत.

Story img Loader