सलग १६ व्या दिवशी पेट्रोल- डिझेल महाग, जाणून घ्या राज्यातील प्रमुख शहरांमधील दर

केंद्र सरकारने इंधर दरवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले. मात्र, अजूनही यावर तोडगा काढण्यात अपयश येत असल्याचे दिसते.

fuel price hike, Petrol, diesel
प्रतिकात्मक छायाचित्र

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग १६ व्या दिवशी वाढ झाली असून मुंबईत पेट्रोलने लिटरमागे ८६. २४ रुपये तर डिझेलने लिटरमागे ७३. ७९ रुपये इतका दर गाठला आहे. इंधन दरवाढीमुळे महागाई वाढणार असून याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे.

गेल्या काही दिवसांत देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. केंद्र सरकारने इंधर दरवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले. मात्र, अजूनही यावर तोडगा काढण्यात अपयश येत असल्याचे दिसते. सलग सोळाव्या दिवशी इंधनाचे दर वाढले आहेत. मुंबईत पेट्रोल १६ पैशांनी तर डिझेल १५ पैशांनी महागले आहे. मुंबईत पेट्रोलच्या दराने लिटरमागे ८६. २४ रुपये तर डिझेलच्या दराने लिटरमागे ७३. ७९ रुपये इतका दर गाठला.

राज्यातील प्रमुख शहरांमधील दर ( हे दर प्रतिलिटर नुसार असून प्रत्यक्षात पेट्रोल पंपावर दरात किरकोळ तफावत येऊ शकते):

पुणे
पेट्रोल – ८६. ०३ रुपये
डिझेल – ७२. ४७ रुपये

नागपूर
पेट्रोल – ८६. ७२ रुपये
डिझेल – ७४. ३२ रुपये

औरंगाबाद
पेट्रोल – ८७. २२ रुपये
डिझेल – ७४. ७८ रुपये

नाशिक
पेट्रोल – ८६. ५७ रुपये
डिझेल – ७२. ९९ रुपये

ठाणे
पेट्रोल – ८६. ३२ रुपये
डिझेल – ७३. ८७ रुपये

कोल्हापूर
पेट्रोल ८६. ३८ रुपये
डिझेल – ७२. ८३ रुपये

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Fuel price hike in india petrol diesel rise for 16th consecutive day know rates in mumbai pune nashik