Fuel Price Hike: इंधनाच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचे दर

आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाली आहे.

Petrol Diesel Price Today, Petrol and diesel prices, petrol diesel price in mumbai, pune, nashik, nagpur, aurangabad
आजचे इंधनाचे दर

आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाली आहे. सलग तिसऱ्या दिवशी तेल विपणन कंपन्यांनी दोन्ही पेट्रोल-डिझेलच्या किमती प्रति लिटर ३५-३५ पैशांनी वाढवल्या आहेत. या आठवड्यात सोमवार-मंगळवारी इंधनाच्या किमती स्थिरावल्या होत्या. मात्र, बुधवारपासून दरात सातत्याने वाढ होत आहे. एका महिन्यापासून तेल विपणन कंपन्या पेट्रोलच्या किमती वाढवत आहेत. तेव्हापासून आतापर्यंत २४ वेळा पेट्रोलच्या दरात ७.४५ रुपयांनी वाढ झाली आहे. तर, डिझेलच्या दरात २५ वेळा वाढ झाली असून आतापर्यंत ८.७५ रुपयांनी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या एका महिन्यात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ सुरू असून १७ टक्के वाढ झाली आहे.

प्रमुख महानगरातील आजचे दर..

मुंबई: पेट्रोल – ₹११४.४७ प्रति लीटर; डिझेल – ₹१०५.४९ प्रति लीटर

दिल्ली: पेट्रोल – ₹१०८.६४ प्रति लीटर; डिझेल – ₹९७.३७ प्रति लीटर

कोलकत्ता पेट्रोल – ₹१०९.१२ प्रति लीटर; डिझेल – ₹१००.४९ प्रति लीटर

चेन्नई: पेट्रोल – १०५.४३ रुपये प्रति लीटर; डिझेल – ₹१०१.५९ प्रति लीटर

जाणून घ्या तुमच्या शहरामधील दर..
देशामधील तिन्ही तेल कंपन्या एचपीसीएल, बीपीसीएल आणि आयओसी रोज सकाळी सहा वाजता इंधनाच्या नवीन दरांची घोषणा करतात. या नव्या दरांची माहिती त्यांच्या वेबसाईटवर मिळते. तर दुसरीकडे फोनवरही एसएमएस करुन नवीन दर तपासण्याची सुविधा देण्यात आलीय. 92249 92249 क्रमांकावर एसएमएस पाठवून पेट्रोल डिझेलच्या नवीन दरांबद्दल माहिती मिळवता येते. RSP < स्पेस > पेट्रोल पंप डिलरचा कोड लिहून 92249 92249 वर पाठवावा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Fuel price hike know todays rates of petrol diesel hrc

Next Story
शांत व आरोग्यदायी झोपेसाठी सेंद्रिय बिछाना
ताज्या बातम्या