दिल्ली विमानतळावर अलर्ट घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे विमानतळावर रुग्णवाहिका, अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं आहे. आज दुपारी दिल्ली विमानतळावरील धावपट्टीवरून एका विमानाने उड्डाण केलं, त्याक्षणीच एक चिमणी विमानाला धडकल्यामुळे इमर्जन्सी घोषित करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्ली विमानतळावरून दुबईला जाणाऱ्या फेडएक्स एअरक्राफ्टने उड्डाण करताच एक चिमणी या विमानाला धडकली. त्यानंतर विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. यादरम्यान, विमानतळ प्रशासनाने अलर्टची घोषणा केली आहे. जेणेकरून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करता येईल.

हे ही वाचा >> मुंबईच्या समुद्र किनाऱ्याजवळ दिसली संशयास्पद बोट, दोन पाकिस्तानी नागरिक बोटीवर असल्याचा संशय, अलर्ट जारी

एखादा पक्षी विमानाला धडकणं खूप धोकादायक सिद्ध होऊ शकतं. पक्षाच्या धडकेमुळे आतापर्यंत जगभरात अनेक मोठे अपघात झाले आहेत. मोठ्या विमान दुर्घटना जगाने पाहिल्या आहेत. त्यामुळेच विमानतळ प्रशासननाने अलर्ट जारी केला आहे. विमानतळाच्या अवती-भोवती दाट मानवी वस्ती हे अशा घटना वाढण्यामागचं प्रमुख कारण आहे. कारण माणसांकडून अन्न मिळेल या आशेने पक्षी मानवी वस्त्यांकडे येतात. मानवी वस्तीकडे उडत येत असताना पक्षी विमानाला धडकतात.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Full emergency declared at delhi airport after dubai bound fedex aircraft suffers bird hit asc
First published on: 01-04-2023 at 15:45 IST