scorecardresearch

संपूर्ण लसीकरण झालेल्या भारतीयांना स्वित्झर्लंडचे दरवाजे खुले

स्वित्झर्लंड सरकारचा निर्णय, कोविड टेस्ट, विलगीकरणाची गरज नाही

संपूर्ण लसीकरण झालेल्या भारतीयांना स्वित्झर्लंडचे दरवाजे खुले
स्वित्झर्लंडमधील करोना प्रादुर्भाव कमी झाल्याने तिथले मास्कसहीत सर्व निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत.

स्वित्झर्लंडमध्ये करोनामुळे लागू करण्यात आलेले निर्बंध २६ जूनपासून शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे भारतातून येणाऱ्या नागरिकांसाठीच्या नियमांमध्ये बदल केले आहे. लसीचे दोन्ही डोस घेतले असतील किंवा करोनातून बरे झाले असतील अशा नागरिकांना आता कोणत्याही चाचणीशिवाय आणि विलगीकरणाशिवाय स्वित्झर्लंडमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.

जे करोनातून बरे झालेले नाहीत किंवा ज्यांचं लसीकरण झालेलं नाही, त्यांना मात्र निगेटिव्ह RTPCR अहवाल सादर करणं बंधनकारक आहे. त्याचबरोबर त्यांना देशात प्रवेश केल्यानंतर विलगीकरणात राहणंही बंधनकारक आहे, अशी माहिती स्वित्झर्लंड सरकारने दिली आहे. जिथे करोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा प्रसार झालेला आहे अशा इतर देशांसाठीही असेच नियम लागू असतील असंही सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा- करोना संकट संपेपर्यंत मजुरांच्या घरातील चूल सुरु ठेवा – सुप्रीम कोर्ट

त्याचबरोबर स्वित्झर्लंड सरकारने असंही सांगितलं आहे की, देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी कोविड प्रमाणपत्र जर कोणाला हवं असेल तर तेही देण्यात येईल. हे प्रमाणपत्र स्वित्झर्लंडमध्ये ग्राह्य धरलं जाईल. मॉल, हॉटेलमध्ये जर प्रवेश नाकारण्यात आला तर हे प्रमाणपत्र दाखवल्यानंतर सदर व्यक्तीला प्रवेश दिला जाईल. संपूर्ण लसीकरण किंवा करोना झाल्याचा कालावधी यांच्या आधारावर हे प्रमाणपत्र देण्यात येईल.

या देशात मास्कची सक्तीही लवकरच रद्द करण्यात येणार आहे. त्याचबरोबर हॉटेलमध्ये जाऊन जेवण्यावरचे निर्बंधही हटवण्यात येतील. या महिन्याच्या अखेरपर्यंत देशातल्या अर्ध्याहून अधिक प्रौढांचं लसीकरण पूर्ण होणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या