scorecardresearch

मिखाइल गोर्बाचेव्ह यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार; नियोजित कार्यक्रमामुळे पुतिन गैरहजर राहण्याची शक्यता

‘युनियन ऑफ सोव्हिएत सोशालिस्ट रिपब्लिक्स’चे (सोव्हिएत संघ) अखेरचे अध्यक्ष मिखाइल गोर्बाचेव्ह यांचे मंगळवारी निधन झाले.

मिखाइल गोर्बाचेव्ह यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार; नियोजित कार्यक्रमामुळे पुतिन गैरहजर राहण्याची शक्यता
फोटो – द इंडियन एक्सप्रेस

मॉस्को : ‘युनियन ऑफ सोव्हिएत सोशालिस्ट रिपब्लिक्स’चे (सोव्हिएत संघ) अखेरचे अध्यक्ष मिखाइल गोर्बाचेव्ह यांचे मंगळवारी निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. त्यांच्यावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी गोर्बाचेव्ह यांना आदरांजली वाहिली, मात्र नियोजिक कार्यक्रमांमुळे ते गोर्बाचेव्ह यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार नाहीत, अशी माहिती राष्ट्राध्यक्ष कार्यालयातून देण्यात आली.

‘क्रेमलिन’चे प्रवक्ता दमित्री पेस्कोव्ह यांनी सांगितले की, गोर्बाचेव्ह यांचे पार्थिव ठेवण्यात आलेल्या रुग्णालयात पुतिन गेले होते.  नियोजित कार्यक्रमामुळे शनिवारी होणाऱ्या अंत्यसंस्काराला पुतीन हे त्यांच्या उपस्थित राहणार नाहीत. परंतु त्यांनी दिवंगत नेत्याला आदरांजली अर्पण केली आहे.

गोर्बाचेव्ह यांच्यावर राजकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत का, असा प्रश्न पेस्कोव्ह यांना विचारला असता त्यांनी सांगितले की, अंत्यसंस्कारात ‘ऑनरेरी गार्ड’ आणि अन्य औपचारीकतेसह राजकीय ‘तत्व’ असतील. मॉस्कोच्या नोव्होडेविची दफनभूमीत त्यांची पत्नी रायसाच्या दफनस्थळाच्या शेजारीच गोर्बाचेव्ह यांच्या पार्थिवाचे दफन केले जाणार आहे. त्यांन हाऊस आफ द युनियनच्या पिलर हॉलमध्ये शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. गोर्बाचेव्ह यांनी तत्कालीन सोव्हिएत संघात अनेक सुधारणा करण्याचे प्रयत्न केले होते.  अमेरिका आणि सोव्हिएत संघ यांच्यातील शीतयुद्ध संपवण्यात त्यांची मोठी भूमिका होती. त्यांनी ‘ग्लासनोस्त’ आणि ‘पेरेस्त्रोइका’ म्हणजे खुलेपणा आणि पारदर्शकतेचे धोरण अवलंबले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या