गलवान खोऱ्यातील घटना दुर्देवी, इतिहासात फार महत्त्व नसेल – चिनी राजदूत

‘चीन भारताकडे धोकादायक देश किंवा शत्रू या दृष्टीने पाहत नाही’

भारत आणि चीनमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही पूर्व लडाखमध्ये सीमा प्रश्नावरुन निर्माण झालेला तिढा अद्यापी सुटू शकलेला नाही. तिथे सीमेवर दोन्ही देशांमध्ये तणाव कायम असताना चीनचे भारतातील राजदूत सन विडाँग यांनी गलवान खोऱ्यातील संघर्ष दुर्देवी घटना असल्याचे म्हटले आहे. इतिहासाच्या दृष्टीने ही घटना अल्पकालीन ठरेल असे विडाँग यांचे मत आहे.

१५ जूनच्या संध्याकाळी गलवान खोऱ्यात झालेल्या रक्तरंजित संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले तर चीनचे ४० पेक्षा जास्त सैनिक मारले गेले. आता चर्चा व्यवस्थित सुरु रहावी, यासाठी प्रयत्न करत आहोत. विडाँग यांनी लष्करी आणि मुत्सद्दी पातळीवर झालेल्या चर्चांचा संदर्भ दिला. १८ ऑगस्टला भारत-चीन युथ फोरमच्या कार्यक्रमात सन विडाँग यांनी हे वक्तव्य केले. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे.

“चीन भारताकडे धोकादायक देश किंवा शत्रू या दृष्टीने पाहत नाही. आम्ही भारताकडे सहयोगी आणि संधी म्हणून पाहतो. द्विपक्षीय संबंधात सीमा प्रश्नाला योग्य स्थान मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. मतभेदांवर चर्चा आणि विचारविनिमयातून मार्ग काढला जाईल. भारत आणि चीन दोघांनी संघर्ष टाळून शांततामय मार्गाने वाटचाल केली पाहिजे” असे सन विडाँग म्हणाले.

“भारत आणि चीन दोन्ही मोठे उदयोन्मुख देश आहेत. चीन आणि भारत दोघांनी विचारधारेच्या आधारावर रेषा ओढण्याची जुनी विचारसरणी सोडून दिली पाहिजे. एकाचा फायदा म्हणजे दुसऱ्याचं नुकसान, ही विचार करायची पद्धत सोडून दिली पाहिजे. अन्यथा तुमची वाटचाल चुकीच्या दिशेने होईल” असे सन विडाँग यांनी म्हटले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Galwan clashes unfortunate now working to handle talks properly china envoy dmp

ताज्या बातम्या