Premium

Gandhi Jayanti 2023 : मोदी, खरगेंसह दिग्गज नेत्यांनी केलं राजघाटावर अभिवादन, गांधी विचारांना दिला उजाळा

Gandhi Jayanti 2023 at Rajghat : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राजधानी दिल्लीतील राजघाट येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाला सर्व राजकीय, सामाजिक क्षेत्रातील नेतेमंडळ हजर असतात.

Narendra Modi at rajghat
नरेंद्र मोदींनी राजघाटावर केलं अभिवादन (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजधानी दिल्ली येथील राजघाट येथे जाऊन गांधींना अभिवादन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, दिल्लीचे उपराज्यपाल वी. के. सक्सेना, उपराज्यपाल जगदीप धनखड यांच्यासहीत अनेक नेते राजघटावर बापूंना श्रद्धांजली अर्पण करण्यारकता पोहोचले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“गांधी जयंतीनिमित्त मी महात्मा गांधींना नमन करतो. त्यांच्या शिकवणीमुळे आमचा मार्ग उजळत आहे. महात्मा गांधींचा प्रभाव जागतिक आहे, संपूर्ण मानवजातीला एकता आणि करुणेची भावना पुढे नेण्यासाठी प्रेरित करते. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू या. गांधींचे विचार प्रत्येक तरुणाला परिवर्तनासाठी पात्र बनवून त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी बळ मिळू दे. ज्यामुळे सगळीकडे एकता आणि सद्भावना वाढेल”, असं नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केलं म्हणाले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राजधानी दिल्लीतील राजघाट येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाला सर्व राजकीय, सामाजिक क्षेत्रातील नेतेमंडळ हजर असतात.

आज दिवसभर अनेक नेतेमंडल राजघाट येथे दाखल होऊन महात्मा गांधींना नमन करतील.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gandhi jayanti 2023 celebration at rajghat by leaders and all you need to know in marathi sgk

First published on: 02-10-2023 at 08:43 IST
Next Story
“आपले पंतप्रधान मोदी ‘विश्वगुरू’ असले तरी…”, वाढत्या खलिस्तानी चळवळींवरून ठाकरे गटाचा हल्लाबोल