उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्य़ात बत्तीस वर्षांच्या एका महिलेवर दोन जणांनी सामूहिक बलात्कार करून त्या घटनेचे चित्रीकरण सामाजिक माध्यमांवर टाकले.
मुझफ्फरनगर जिल्ह्य़ात सामूहिक बलात्कार करून त्याचे चित्रीकरण प्रसारित करण्याची ही दुसरी घटना आहे. १३ जानेवारीला एका आरोग्य कर्मचारी महिलेने तिच्यावरील सामूहिक बलात्काराचे चित्रण समाजमाध्यमांवर टाकण्यात आल्याने आत्महत्या केली होती.
आताच्या घटनेत एका बत्तीस वर्षांच्या महिलेने तक्रार केली असून तिच्यावर दोन जणांनी खटोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कैलावडा येथे दोन जणांनी दोन वर्षांपूर्वी सामूहिक बलात्कार केला होता. त्यानंतर आरोपी तिला ब्लॅकमेल करीत होते. त्यानंतर या बलात्काराची चित्रफीत काल समाज माध्यमांवर टाकण्याक आली.
परिक्षेत्र अधिकारी जोगेंदर लाल यांनी कलम ३७६ डी व कलम ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपी अर्शद व नाझेर हे फरारी आहेत.
या महिलेची वैद्यकीय तपासणी चालू असून तिने काल दंडाधिकाऱ्यांपुढे गुन्हेगारी दंड संहिता कलम १६४ अन्वये निवेदन केले होते. आरोपींचा शोध सुरू असून कैलावाडा खेडय़ात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. याच जिल्ह्य़ात छाप्रा खेडय़ात एका ४० वर्षांच्या विवाहितेवर सामूहिक बलात्कार करून चित्रफीत व्हॉट्स अपवर टाकण्यात आली होती नंतर या विवाहितेने विष घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ ूउडाली.