Gang Rape on Two Girls : लग्नाच्या मंडपातून दोन अल्पवयीन मुलींचं अपहरण करण्यात आलं त्यानंतर त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींना अटक केली आहे. लग्नाच्या मंडपातून या मुली गायब झाल्यानंतर त्यांचा शोध घेण्यात येत होता. त्यावेळी या मुली निर्जन ठिकाणी सापडल्या. या घटनेनंतर मुलींच्या सांगण्यावरुन त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार केली.
कुठे घडली घटना?
ही घटना ओडिशामध्ये घडली आहे. ब्रह्मपूर येथील पोलीस अधीक्षक श्रवण विवेक यांनी या घटनेबाबत माहिती दिली. या दोन मुलींच्या कुटुंबाने जी तक्रार केली त्यानंतर आम्ही तक्रार नोंदवून घेतली. यातली एक मुलगी १४ वर्षांची आहे तर दुसरी १५ वर्षांची आहे. आम्ही सगळे लग्नासाठी आलो होतो त्यावेळी या दोघींना लग्नाच्या मंडपातून पळवण्यात आलं त्यानंतर त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या दोघींनाही आरोपींनी निर्जन ठिकाणी नेलं होतं. त्यानंतर हे आरोपी विशाखापट्टणम या ठिकाणी पळून जाण्याच्या बेतात होते त्यावेळी पोलिसांनी त्यांना अटक केली.
पोलिसांनी या प्रकरणी नेमकं काय सांगितलं?
पोलिसांनी सांगितल्यानुसार या प्रकरणाची आम्ही चौकशी करत आहोत. दोन जणांनी या मुलींचं अपहरण केलं. त्यानंतर त्यांचे आणखी दोन मित्र त्यांना भेटले. त्या चौघांनी मिळून या मुलींवर सामूहिक बलात्कार केला. या मुली लग्नाच्या मंडपातून गायब झाल्यानंतर त्यांचा शोध सुरु केला. त्या दोघीही एका निर्जन ठिकाणी या सगळ्यांन आढळल्या. मुलींनी घडलेला प्रकार सांगितल्यावर या प्रकरणी पोलीस तक्रार दाखल करण्यात आली. या दोन्ही मुलींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार या चार आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अशी माहिती विवेक यांनी दिली. हे चौघेही विशाखापट्टणम या ठिकाणी पळून जाण्याच्या बेतात होते तेव्हा त्यांना अटक करण्यात आली आहे. एनडीटीव्हीने या विषयीचं वृत्त दिलं आहे.