Gang Raped Viral Video : नववीतील एका मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे तिच्याच वर्गातील सहा अल्पवयीन मुलांनी बलात्कार केला असून या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. टाइम्स नाऊने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोपी मुलांविरुद्ध कारवाईची मागणी केली.

व्हायरल व्हिडिओनंतर घटना उजेडात

मुलीच्या एका नातेवाईकाने व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर बालंगीर पोलिस अधीक्षक (एसपी) यांना कळवले. सहापैकी पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले. हे सर्वजण पीडित मुलीच्या वर्गातील आहेत. एसपींच्या निर्देशानुसार, सहाही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आणि पुढील तपास सुरू आहे. लैंगिक अत्याचाराची माहिती मिळताच, मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिस अधीक्षक (एसपी) यांच्याकडे जाऊन या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी, आरोपी मुलांवर कारवाई आणि अल्पवयीन पीडितेला न्याय मिळावा अशी लेखी तक्रार दाखल केली.

पीडितेवर आलटून पालटून बलात्कार

या मुलांनी पीडितेवर आलटून पालटून अत्याचार केले. तसंच, या कृत्याचे चित्रीकरण केले आणि व्हिडिओ इतरांसोबत शेअर केला. अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाने पोलिस तक्रार दाखल केल्यानंतर, एसपींनी तुरेकेला पोलिसांना तात्काळ तपास सुरू करण्याचे आणि योग्य कारवाई करण्याचे निर्देश दिले. एसपींच्या निर्देशानुसार, स्थानिक पोलिसांनी पाचही अल्पवयीन मुलांना पॉक्सो कायदा, सामूहिक बलात्कार कायदा आणि व्हिडिओ व्हायरल कायद्याअंतर्गत ताब्यात घेतले आहे.

तथापि, नववीच्या विद्यार्थिनीवर सहा जणांनी कधी आणि कुठे सामूहिक बलात्कार केला हे स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, या घटनेमुळे स्थानिक समुदायात चिंता निर्माण झाली आहे. पोलिस अधिकाऱ्यांकडून वैद्यकीय तपासणी आणि पुढील तपास सुरू आहे.