Atiq Ahmad Son Aban Ahmad Dead: गेल्या आठवड्यात गँगस्टर अतीक अहमद याच्या सर्वात लहान मुलाचा झाशी येथे अपघातात मृत्यू झाला आहे. पाच मुलांपैकी सर्वात लहान असलेला अबान अहमद याचा या अपघातात मृत्यू झाला. तुरुंगात असलेल्या भावा भेटण्यासाठी जात असाताना दुभाजकाला धडकून २१ वर्षीय अबानचा मृत्यू झाला, अशी माहिती झाशी पोलिसांनी दिली. कार दुभाजकाला धडकल्याचा काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ आता समोर आला आहे. भरधाव कार दुभाजकाला धडकून समोरच्या भागाचे मोठे नुकसान झाल्याचे व्हिडीओत दिसत आहे.
अबान अहमद याचा अपघात
अबान अहमद त्याच्या चार मित्रांसोबत कारमधून निघाला होता. तुरुंगात असलेल्या भावाला भेटण्यासाठी अबान निघाला होता. दरम्यान, कार झाशी येथे महामार्गावर दुभाजकाला धडकली यातच अबान याचा मृत्यू झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, कारचा समोरील भागाचे पूर्णपणे नुकसान झाले. समोर आलेल्या व्हिडीओत अबान जात असलेली कार प्रचंड वेगाने धावत असल्याचे दिसत आहे. कार डाव्या दिशेने रस्ता सोडून खाली उतरते आणि त्याच वेगात रस्त्याच्या कडेला असणाऱ्या दुभाजकावर जोरदार आदळते.
भीषण अपघाताचा व्हिडीओ आला समोर
दुभाजकाला धडकल्यानंतर कार काही काळ हवेत घिरटी घेऊन खाली आदळते, यात कारच्या समोरच्या भागाचे प्रचंड नुकसान झाले. काही भाग तुटून रस्त्यावर विखुरल्याचे व्हिडीओत दिसत आहे.
तीनजण जखमी
या अपघातात अबान अहमद याच्यासह आणखी एकाचा मृत्यू झाला. इतर तीन जण गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अबान अहमद हा गँगस्टर अतीक अहमद याच्या सर्वात लहान मुलगा होता. गँगस्टर अतीक अहमद याची एप्रिल २०२३ मध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
भावाला भेटण्यासाठी जाताना अपघात
अबान अहमद हा अतीक अहमदचा सर्वात लहान मुलगा मुलगा होता. अबान त्याच्या इतर मित्रांसोबत तुरुंगात असलेला भाऊ अली अहमद याला भेटण्यासाठी निघाला होता. अली अहमद झाशीच्या जिल्हा कारागृहात बंद आहे. ०१ ऑक्टोबर २०२५ रोजी त्याला नैनी मध्यवर्ती कारागृहातून झाशीला हलविण्यात आले होते. अलीला भेटण्यासाठी अबान प्रयागराज येथून झाशीला जात असताना त्याच्या कारचा अपघात झाला. यातच त्याचा मृत्यू झाला आहे.
