प्रसिद्ध गायक आणि काँग्रेस नेता सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपी कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईने प्रसिद्धीसाठी अभिनेता सलमान खानला धमकी दिली का? या प्रश्नाचं थेट उत्तर दिलं. “प्रसिद्धीसाठी असं केलं असतं तर आम्ही अभिनेता शाहरूख खानची हत्या केली असती. प्रसिद्धीसाठी हत्या करायची असती तर बॉलिवूडमध्ये लोकांची कमी नाही,” असं मोठं विधान केलं. त्याने तुरुंगातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘एबीपी न्यूज’ला मुलाखत दिली. यात त्याने हे मत व्यक्त केले.

लॉरेन्स बिश्नोई म्हणाला, “प्रसिद्धीसाठी असं केलं असतं तर आम्ही अभिनेता शाहरूख खानची हत्या केली असती. प्रसिद्धीसाठी हत्या करायची असती तर बॉलिवूडमध्ये लोकांची कमी नाही. कुणालाही मारलं असतं. आमचा एक उद्देश आहे त्यासाठीच आम्ही सलमान खानला माफी मागण्यास सांगितलं.”

Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई
Kangana Ranaut Vikramaditya Singh Himachal Pradesh Mandi Loksabha Election 2024
Celebrity Fight: कंगनासमोर राजघराण्यातील वंशजाचे आव्हान; सोनिया गांधींनी केली वाट बिकट
The Kerala Story triggering political drama in Kerala In Loksabha Polls 2024
‘द केरला स्टोरी’चा राजकीय आखाड्यात प्रवेश; केरळमधील वातावरण तापले; वाचा नक्की काय आहे प्रकरण!
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा

“…तर जूहू बीचवर फिरणाऱ्या कोणत्याही कलाकाराला मारलं असतं”

“प्रसिद्धीसाठी किंवा पैसे गोळा करण्यासाठी बॉलिवूडमधील कुणाला मारायचं असेल, तर जूहू बीचवर फिरणाऱ्या कुणालाही मारलं असतं. मात्र, तसं नाही. आम्ही इतर कुणालाही धमकी दिली नाही. सलमान खानबाबत आमचे काही वैचारिक मतभेद आहेत आणि त्यामुळे आम्ही सलमानला माफी मागण्यास सांगत आहे. माफी मागायची नसेल तर देवाला माहिती पुढे काय होईल. देव कुणाचाही अहंकार ठेवत नाही,” असं मत लॉरेन्स बिश्नोईने व्यक्त केलं.

हेही वाचा : “पंजाबी गायक व कलाकारांकडून गँगस्टर पैसे घेतात का? ” लॉरेन्स बिश्नोई उत्तर देत म्हणाला, “बॉलिवूडप्रमाणे…”

“त्याने कायम आमच्या समाजाला तुच्छ लेखलं”

लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला उघड उघड धमकी दिली आहे. सलमान खानचा अहंकार मोडणार, असा इशारा लॉरेन्स बिश्नोईने दिला आहे. तो म्हणाला, “माझ्या समाजातील लोकांचा सलमान खानवर खूप राग आहे. त्याने कायम आमच्या समाजाला तुच्छ लेखलं. त्याच्यावर केस चालू आहे. पण, अद्यापही माफी मागितली नाही. आमच्या परिसरात प्राण्याचा जीव घेतला जात नाही. झाडं कापण्यास बंदी आहे. मात्र, जिथे बिश्नोई समाजाची संख्या जास्त आहे, तिथे येत सलमान खानने हरीणाची शिकार केली आहे.”

“कधी ना कधी सलमान खानचा अहंकार मोडणार आहे”

“माझा सलमान खानवर लहानपासून राग आहे. कधी ना कधी सलमान खानचा अहंकार मोडणार आहे. त्याने आमच्या देवाच्या मंदिरात येऊन माफी मागितली पाहिजे. सलमान खानने बिश्नोई समाजातील लोकांना पैशांचं आमिष दाखवलं होतं. परंतु, सलमान खानला प्रसिद्धीसाठी नाहीतर हेतूच्या उद्देशाने मारणार आहोत,” असे बिश्नोईने म्हटलं.