scorecardresearch

Premium

लखनऊ न्यायालयात गुंडाची हत्या; मुख्तार अन्सारीचा साथीदार संजीव माहेश्वरी जीवा ठार

लखनऊ कारागृहात असलेल्या ४८ वर्षीय जीवाला एका खटल्याच्या सुनावणीसाठी न्यायालयात आणले होते.

gangster sanjeev maheshwari jeeva murder in court
संजीव माहेश्वरी जीवा याची लखनऊ न्यायालय संकुलात गोळय़ा झाडून हत्या करण्यात आली

लखनऊ : उत्तर प्रदेशमधील कुख्यात गुंड आणि राजकीय नेता मुख्तार अन्सारीचा कथित साथीदार संजीव माहेश्वरी जीवा याची बुधवारी लखनऊ न्यायालय संकुलात गोळय़ा झाडून हत्या करण्यात आली. या गोळीबारात दोन जण जखमी झाले. हल्लेखोर वकिलाच्या वेशात आला होता, त्याला घटनास्थळीच पकडल्याचे पोलिसांनी सांगितले.

लखनऊ पोलीस आयुक्त एस. बी. शिरोडकर यांनी सांगितले, की लखनऊ कारागृहात असलेल्या ४८ वर्षीय जीवाला एका खटल्याच्या सुनावणीसाठी न्यायालयात आणले होते. तो मुझफ्फरनगर जिल्ह्यातील रहिवासी होता आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील नंतर राजकारणात आलेला कुख्यात गुंड मुख्तार अन्सारी टोळीचा सदस्य होता. त्याच्यावर भाजप आमदार कृष्णानंद राय आणि तत्कालीन मंत्री ब्रह्मदत्त द्विवेदी यांच्या हत्येचा आरोप होता. तसेच खून, फसवणूक, गुन्हेगारी कट आदी २४ गुन्हे त्याच्यावर दाखल होते.

manoj jarnage patil
“बाकीचं नंतर बघू, आधी माझ्या किडन्या तपासा”, मनोज जरांगेंच्या किडनीचा नेमका घोळ काय?
Actor Vijay Antony reacts on Daughter Meera suicide
“मी तिच्याबरोबर मेलो,” १६ वर्षीय मुलीच्या आत्महत्येनंतर अभिनेत्याची भावुक पोस्ट; म्हणाला, “जिथे जात, धर्म, पैसा…”
tanushree dutta on rakhi sawant
“तिने पाच लग्नं केलीत, पण…” तनुश्री दत्ताची राखी सावंतवर टीका; म्हणाली, “तिला पुरुष…”
ramdas kadam on uddhav thackeray aaditya
“आदित्यसाहेब आणि त्यांचा बाप…”, रामदास कदमांची टीका; म्हणाले, “…आता दोघंही पळतायत!”

या गोळीबारात दोन वर्षीय बालिका आणि पोलीस शिपाई जखमी झाले. त्यांना रुग्णालयात तातडीने हलवण्यात आले. यापैकी बालिकेची प्रकृती गंभीर आहे. पोलीस शिपायाची प्रकृती स्थिर आहे. १० फेब्रुवारी १९९७ रोजी ब्रह्मदत्त तिवारींची त्यांच्या अंगरक्षकासह फारुकाबाद जिल्ह्यात हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी १७ जुलै २००३ रोजी सत्र न्यायालयाने जीवाला दोषी ठरवून, जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. न्यायालयात झालेल्या या गोळीबार व हत्येनंतर वकिलांनी पोलिसांविरुद्ध निदर्शने केली. कायदा-सुव्यवस्था आणि सुरक्षाव्यवस्था पुरवण्यात अपयशी ठरल्याबद्दल त्यांनी पोलिसांचा निषेध केला. तसेच तातडीने कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्याची मागणी केली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-06-2023 at 03:52 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×