चंडीगड, नवी दिल्ली : पंजाबमधील ‘मोस्ट वाँटेड’ गुन्हेगारांपैकी एक असलेला कुख्यात गुंड सुखदुल सिंग ऊर्फ सुखा दुनेके याची कॅनडाच्या विनिपेग शहरात अज्ञात लोकांनी हत्या केल्याची माहिती सूत्रांनी गुरुवारी दिली. ‘हा टोळीयुद्धाचा परिणाम असल्याचे कळते’, असे एका सूत्राने सांगितले. खून, खुनाचा प्रयत्न आणि दरोडा यांसह किमान १८ गुन्हे दाखल असलेल्या कॅनडातील या कुख्यात गुंडाला कॅनडाच्या स्थानिक वेळेनुसार बुधवारी रात्री ठार मारण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा >>> विमान हवेत असताना तुफान राडा; प्रवाशाला कपडे फाटेपर्यंत मारहाण, VIDEO व्हायरल

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

गेल्या जून महिन्यात खलिस्तानी फुटीरवादी नेता हरदीप सिंग निज्जर याच्या ब्रिटिश कोलंबियात झालेल्या हत्येवरून भारत व कॅनडा यांच्यात राजनैतिक वाद सुरू असतानाच ही घडामोड झाली आहे. निज्जरच्या हत्येमागे भारतीय एजंटचा ‘संभाव्य’ हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केला आहे.

पंजाबच्या मोगा जिल्ह्यातील दुनेके कलाँ खेडय़ाचा मूळ रहिवासी असलेला हा कुख्यात गुंड डिसेंबर २०१७ मध्ये कॅनडाला पळून गेला होता, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. दिवदर बंबिहा टोळीचा सक्रिय सदस्य असलेला दुनेके हा विदेशी भूमीवरून टोळीच्या कारवायांचे संचालन करत होता. याशिवाय खंडणीचे रॅकेट चालवणे, पंजाब व आसपासच्या भागातील प्रतिस्पर्धी टोळय़ांच्या सदस्यांची स्थानिक संपर्काकरवी लक्ष्य करून हत्या करणे आणि आपल्या विदेशातील सहकाऱ्यांच्या जाळय़ाचे व्यवस्थापन करणे यातही तो गुंतला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.

गेल्या काही महिन्यांत, दुनेकेने खंडणीची मागणी करण्याचे प्रकार पंजाब व आसपासच्या भागात वाढले होते.

गोल्डी ब्रारच्या साथीदारांचा पंजाबमध्ये शोध

चंडीगड :  कॅनडास्थित टोळीचा म्होरक्या गोल्डी ब्रार याच्याशी संबंधित गुन्हेगारांना पकडण्यासाठी पंजाब पोलिसांनी गुरुवारी अनेक ठिकाणी छापे घातले. सकाळी सात वाजताच्या सुमारास सुरू झालेली ही विशेष मोहीम राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येत असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा >>> “संसदेच्या जुन्या वास्तूत दोष होता?” महिला आरक्षण विधेयकावरून काँग्रेसचा थेट पंतप्रधान मोदींना प्रश्न

 ‘ही विशेष मोहीम संपूर्ण पंजाबमध्ये १२०० हून अधिक ठिकाणी राबवण्यात येत आहे’, अशी माहिती विशेष पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) अर्पित शुक्ला यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेली अनेक पोलीस अथके या मोहिमेचा भाग आहेत.

 ‘सुमारे ५ हजार पोलीस या मोहिमेत सहभागी झाले आहेत. पोलीस महानिरीक्षक, पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वत: या मोहिमेवर देखरेख ठेवून आहेत’, असेही शुक्ला म्हणाले. कुख्यात गुंड गोल्डी ब्रार हा गायक सिद्धू मूसेवाला याच्या हत्येतील प्रमुख आरोपी आहे. ‘सिद्धू मूसेवाला’ या नावाने लोकप्रिय असलेल्या शुभदीप सिंग सिद्धू याची गेल्या वर्षी २९ मे रोजी पंजाबच्या

Story img Loader