मांडय़ा : कर्नाटकात हत्या झालेल्या पत्रकार गौरी लंकेश यांची आई आणि बहीण शुक्रवारी काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’त सहभागी झाल्या. गौरी लंकेश यांची आई इंदिरा लंकेश आणि बहीण कविता लंकेश यांनी कर्नाटकमधील मांडय़ा जिल्ह्यात राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर काही अंतरापर्यंत त्या यात्रेत चालल्या. राहुल गांधी यांनी इंदिरा लंकेश यांना आिलगन देऊन त्यांचे यात्रेत स्वागत केले. पदयात्रेदरम्यान ते इंदिरा यांचा हात पकडून चालत होते. गौरी लंकेश या कर्नाटकमधील होत्या. काँग्रेसने ट्विटरवर यासंबंधी एक छायाचित्र प्रसारित केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांच्यासोबत दिवंगत पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यां गौरी लंकेश यांचा परिवार. गौरी लंकेश यांचा साहसी आणि निर्भिड आवाज द्वेष आणि हिंसेच्या समर्थकांनी दाबला. ही यात्रा देशात पसरलेल्या द्वेषाविरोधात आहे. आता आम्ही घाबरणार नाही. थांबणार नाही.’’, असेही काँग्रेसने नमूद केले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gauri lankesh mother and sister participated bharat jodo in karnataka of congress ysh
First published on: 08-10-2022 at 00:02 IST