scorecardresearch

Premium

गौतम अदानी आणि मुकेश अंबानींवर आहे विदेशी कर्जाचा डोंगर; बँक ऑफ बडोदाच्या अहवालातून माहिती उघड

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत समाविष्ट असलेले मुकेश अंबानी आणि गौतम अदानी हे विदेशी कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहेत.

संग्रहीत फोटो
संग्रहीत फोटो

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत समाविष्ट असलेले मुकेश अंबानी आणि गौतम अदानी हे विदेशी कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहेत. बँक ऑफ बडोदानं भारतीय कंपन्यांनी घेतलेल्या विदेशी कर्जाचा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या आकडेवारीच्या आधारे असं म्हटलं आहे की, भारतीय कंपन्यांनी घेतलेल्या एकूण विदेशी कर्जात अंबानी आणि अदानी यांच्या कंपन्यांचा वाटा २० टक्के इतका आहे.

अहवालात पुढे म्हटलं आहे की, २०२१-२२ या आर्थिक वर्षात भारतीय कंपन्यांनी विदेशी कर्जदारांकडून ३८.२ बिलियन डॉलरचं (भारतीय चलनात २.९ लाख कोटी रुपये) कर्ज घेतलं आहे. यामध्ये मुकेश अंबानींच्या रिलायन्स उद्योग समूहाने आणि गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील कंपन्यांनी ८.२५ बिलियन डॉलरचं (भारतीय चलनात ६३ हजार कोटी) कर्ज घेतलं आहे.

mhada houses thane
ठाण्यातील आर्थिक दुर्बल घटकांची म्हाडा घरे महाग! निश्चित किमतीत विकासकाकडून परस्पर सहा लाखांची वाढ
maharashtra, second place, country, flood, heavy rains, floods, lightning strike
अतिवृष्टी, पुराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र देशात द्वितीय स्थानी; राज्यात वीज पडण्याच्या ४७ घटनांची नोंद
lack of facilities in registration and stamp department offices in mumbai
कार्यालयांच्या नूतनीकरणासाठी मुद्रांक विभागाची विकासकांवर मदार
justin_trudeau_and_narendra_modi
भारत-कॅनडा यांच्यातील तणावामुळे मसूर डाळ महागणार ? जाणून घ्या…

भारतीय कंपन्या आपली भांडवलासंबंधित गरज पूर्ण करण्यासाठी एक्सटर्नल कमर्श‍ियल बोरोविंग्स (ECB) कडून विदेशी कर्ज घेतात. हा कर्ज पुरवठा युरोप, जपान आणि यूएस सारख्या देशांकडून केला जातो. भारतीय बँकांच्या तुलनेत हे कर्ज अधिक स्वस्त असते. कारण विकसित देशांचे व्याजदर विकसनशील देशांपेक्षा कमी आहेत.

अहवालात म्हटलं आहे की, गेल्या ८ वर्षांत भारतीय कंपन्यांनी २६० बिलियन डॉलरचं विदेशी कर्ज घेतलं आहे. हे कर्ज परदेशी भांडवली बाजार, व्यावसायिक बँका आणि खाजगी इक्विटी गुंतवणूकदारांकडून घेतलं आहे. अदानी समूहाचे गौतम अदानी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांची संपत्ती १९० अब्ज डॉलरपेक्षा अधिक आहे. दोघांच्या सर्व कंपन्यांचं एकूण बाजारी भांडवल एकत्रित केलं तर ते ३३ लाख कोटी रुपयांपेक्षा (429 बिलियन डॉलर) अधिक आहे.

ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, गौतम अदानी यांची एकूण संपत्ती १०२ बिलियन डॉलर इतकी असून ते जगातील ७ व्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. तर मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ९३ बिलियन डॉलर एवढी असून ते जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत १० व्या क्रमांकावर आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gautam adani and mukesh ambani have 8 point 25 billion doller foreign debt bank of baroda report rmm

First published on: 31-05-2022 at 17:53 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×