आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ज्यांची ख्याती आहे, अशा अदाणी उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी नुकतंच एनडीटीव्हीचा यशस्वीरीत्या खरेदी व्यवहार पूर्ण केला. या व्यवहाराची माध्यम आणि राजकीय विश्वात मोठी चर्चा झाल्यानंतर आता गौतम अदाणींच्या एकूणच कारकिर्दीवर आणि त्यांच्या उद्योग विश्वातील वाटचालीची चर्चा सुरू असताना आता खुद्द गौतम अदाणींनीच यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. यावेळी नरेंद्र मोदी सरकारच्या काळात अदाणी समूहाला झुकतं माप दिलं जातं का? या प्रश्नावर अदाणींनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये सविस्तर उत्तर देताना थेट राजीव गांधींच्या कार्यकाळाचा उल्लेख केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अदाणींच्या आर्थिक संकटाचा भार SBI वर पडणार? हजारो कोटींचं दिलंय कर्ज! बँकेचे अध्यक्ष म्हणतात…

गौतम अदाणींनी केले कारकिर्दीचे चार टप्पे!

या मुलाखतीमध्ये यशस्वी उद्योजक होण्यापर्यंतचा प्रवास सांगताना गौतम अदाणींनी आपल्या कारकिर्दीचे एकूण चार टप्पे करून सांगितले आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी हे टप्पे त्यांच्या आयुष्यातील घडामोडींवरून न करता केंद्रात आणि गुजरातमध्ये त्या त्या काळात प्रमुखस्थानी असणाऱ्या व्यक्तींनुसार केले आहेत. यामध्ये पहिला टप्पा राजीव गांधी पंतप्रधान असतानाचा, दुसरा टप्पा नरसिंहराव पंतप्रधान आणि मनमोहन सिंग केंद्रीय अर्थमंत्री असताना १९९१नंतरचा, तिसरा टप्पा केशुभाई पटेल १९९५मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री झाले त्यानंतरचा तर चौथा टप्पा २०११मध्ये नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये राबवलेल्या धोरणांनंतरचा असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे.

Adani Shares: अदाणींच्या शेअर्सची वाताहत सुरूच; एकूण ११८ अब्ज डॉलर्सचा फटका!

सुरुवात राजीव गांधींपासून?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात अदाणी समूहाला फायदा होईल, अशी धोरणं ठरवल्याच्या आरोपावर विचारणा केली असता गौतम अदाणींनी हा दावा फेटाळून लावला. “मी आणि नरेंद्र मोदी गुजरातचे आहोत. त्यामुळेच माझ्यावर अशा प्रकारचे निराधार आरोप केले जातात”, असं ते म्हणाले. मात्र, त्याचवेळी राजीव गांधींनी राबवलेल्या धोरणामुळे आपल्या उद्योगाला चांगलं पाठबळ मिळालं, असं गौतम अदाणी म्हणाले.

“या सगळ्याची सुरुवात राजीव गांधी पंतप्रधान असताना झाली. आयात-निर्यातविषयक धोरणं अधिक खुलं करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि त्यामुळे पहिल्यांदाच खुल्या बाजारात अनेक वस्तू मोठ्या प्रमाणावर येऊ लागल्या. माझा निर्यात व्यवसाय वाढवण्यासाठी याची मोठी मदत झाली”, असं अदाणी यावेळी म्हणाले.

अग्रलेख : चिखल चिकटण्याआधी..

दुसरा टप्पा १९९१नंतरचा!

दरम्यान, दुसरा टप्पा पी. व्ही. नरसिंहराव पंतप्रधान असताना आणि मनमोहन सिंग केंद्रीय अर्थमंत्री असताना आकाराला आल्याचं अदाणी म्हणाले. “या दोघांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक सुधारणा राबवल्या. इतर नवउद्योजकांप्रमाणेच मलाही या धोरणांचा फायदा झाला”, असं ते म्हणाले. “१९९५ साली केशुभाई पटेल गुजरातचे मुख्यमंत्री होईपर्यंत गुजरातमध्ये फक्त राष्ट्रीय महामार्ग ८ च्या आसपास विकास होत होता. केशुभाई पटेल यांनी किनारी भागांच्या विकासावर लक्ष केंद्रीत केलं. त्यातूनच मी मुंद्रामध्ये अदाणी समूहाचं पहिलं बंदर विकसित केलं”, असं अदाणी म्हणाले.

गौतम अदाणींची नरेंद्र मोदींशी किती जवळीक? राजीव गांधींचे नाव घेत खुद्द अदानींनीच सांगितले; म्हणाले “माझ्यावर वेगवेगळे…”

गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून मोदींच्या काळात…

अदाणींनी त्यांच्या कारकिर्दीच्या चौथ्या टप्प्यासाठी २०११मध्ये मोदींनी गुजरातमध्ये राबवलेली धोरणं महत्त्वाची ठरल्याचं सांगतात. “गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या धोरणांमुळे फक्त राज्याचा आर्थिक विकास झाला नाही, तर त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सामाजिक बदल घडले. अनेक अविकसित भागांचा विकास झाला”, अशा शब्दांत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gautam adani on narendra modi government favorable policies pmw
First published on: 29-12-2022 at 13:38 IST