त्याने तय्यबचे काही अश्लील व्हिडिओ सुद्धा बनवले होते. लिव्ह इन रिलेशनशिपची मागणी मान्य केली नाही तर सर्व व्हिडिओ सार्वजनिक करेन अशी दासने तय्यबला धमकी दिली होती. मुरादनगर येथे रहाणार तय्यब एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत नोकरी करतो. नवीन दासपासून सुटका करुन घेण्यासाठी त्याने भाऊ तालीब आणि मित्र समर खानसोबत मिळून दासला लुटण्याचा आणि त्याच्या हत्येचा कट रचला.
तिन्ही आरोपींनी अत्यंत क्रूर पद्धतीने नवीन दासची हत्या केली. त्यांनी नवीनला त्याच्या गाडीत जिवंत जाळले. हा फक्त हत्येचा गुन्हा नसून यामध्ये अपहरण आणि लुटीचा सुद्धा समावेश आहे असे तपास करणाऱ्या पोलिसांनी सांगितले. दास आणि तय्यबमध्ये मागच्या दोन वर्षांपासून समलैंगिक संबंध होते. समलैंगिकांच्या एका पार्टीमध्ये त्यांची ओळख झाली होती.
मैत्री झाल्यानंतर दोघांनी दिल्लीमध्ये समलैंगिकांसाठी पार्टी आयोजित करायला सुरुवात केली. नवीन दास छत्तरपूर येथे आलिशान फ्लॅटमध्ये रहायचा तो तय्यबवर लिव्ह इन रिलेशनशिपसाठी दबाव टाकत होता. तय्यब ऐकत नसल्याचे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. त्यामुळे तय्यबने अखेर नवीन दासच्या हत्येचा कट रचला.