scorecardresearch

GDP Failure : मोदींनी काँग्रेसकडे यावं, आमचे अर्थतज्ज्ञ मदत करतील – राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी पुन्हा एकदा महागाईच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला

rahul gandhi on gdp
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेतली

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी पुन्हा एकदा महागाईच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. राहुल गांधी म्हणाले की, पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे देशातील जनता त्रस्त आहे आणि यामुळे जनतेला त्रास होत आहे. मोदीजींचे केवळ ४-५ उद्योगपती मित्रांना नोटाबंदीचा लाभ मिळत आहे. देशाचा जीडीपी वाढत आहे, असे म्हटले जाते. पण प्रत्यक्षात गॅस, डिझेल आणि पेट्रोलच्या किंमती वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर सातत्याने कमी होत आहेत, असे असूनही आपल्या देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. आज भारताची मालमत्ता विकली जात आहे पण हा पैसा कुठे जातो हा प्रश्न आहे, असा प्रश्न देखील राहुल गांधी यांनी विचारला.

राहुल गांधी म्हणाले, “१९९१ ते २०१२ मधे जे धोरण होतं ते आता राबवलं जात नाहीये. नरेंद्र मोदी म्हणाले मी नवीन धोरण आणणार पण त्यांनी ते केलं नाही. नोटाबंदीचा काय फायदा झाला का?, मेक इन इंडिया चा काय झालं? आज नव्या दृष्टीकोनाची गरज आहे.  १९९० मध्ये सुद्धा प्रचंड अपयश आलं होतं. त्यावेळी काँग्रेसनं नवा दृष्टीकोन स्वीकारला. आजही तीच गरज आहे.  काँग्रेसच्या मनात स्पष्ट कल्पना आहे. पण ही गोष्ट अर्थमंत्री, नीती आयोग, थिंक टॅक्स यांना समजतच नाही. पंतप्रधानांनी हवं तर काँग्रेसकडे मदत मागावी, आमचे अर्थतज्ज्ञ मदत करतील.”

हेही वाचा- GDP त वाढ म्हणजे Gas, Diesel, Petrol च्या किमतीत वाढ; राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

लोकांचा आवाज दडपला जोतोय

“लोकांचा आवाज दडपला जात आहे, संसदेत चर्चा होऊ देत नाही, ज्यामुळे लोकांमध्ये संताप वाढत आहे. शेतकऱ्यांपासून मजूर, छोटे व्यापारी, पगारदार वर्ग, सरकारी कर्मचारी आणि प्रामाणिक उद्योगपतींसाठी नोटाबंदी झाली. पण मोदीजींच्या ४-५ मित्रांसाठी या दरम्यान कमाई झाली आहे आणि वारंवार आर्थिक व्यवहार करण्यात आले”, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

अर्थव्यवस्था अपयशी

राहुल गांधी म्हणाले की, “अर्थव्यवस्था अपयशी ठरत आहे. शेअर बाजारात तेजी आहे, पण त्यामध्ये केवळ ५० कंपन्या वाढत आहेत. देशातील ३०० ते ४०० प्रमुख कंपन्यांची स्थिती खालावत आहे. ते देशाचे भविष्य आहेत, पण त्यांची अवस्था बिकट होत चालली आहे. मध्यमवर्गीय उद्योग देशाला रोजगार देतात, पण मोदीजींच्या मनात त्यांच्यासाठी स्थान नाही.”

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-09-2021 at 18:14 IST