प्रजातीय (जेनरिक) औषधे ही जनऔषधी दुकानांमधून देशभरात प्रत्यक्ष बाजारपेठ किमतीच्या २०-३० टक्के कमी दराने उपलब्ध करून दिली जातील, असे केंद्रीय रसायने व खते राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी सांगितले. ते म्हणाले की, जनऔषधी योजना ही जूनपासून सुरू करण्यात येत आहे. त्यात तीन हजार जनऔषधी दुकाने सुरू करण्यात येणार आहेत. ती दुकाने जिल्हा सरकारी रुग्णालये, सार्वजनिक आरोग्य केंद्रे व वैद्यकीय महाविद्यालयात सुरू केली जातील.