सिगरेटच्या माध्यमातून मानवी आरोग्यास हानिकारक असलेली तंबाखूची वनस्पती जैवइंधने तयार करण्यास उपयुक्त असते असे आता दिसून आले आहे. फक्त हे तंबाखूचे रोप जनुकसंस्कारित प्रकारचे आहे. तंबाखूतील विशिष्ट प्रथिने ही थिओरेडॉक्सिन म्हणून ओळखली जातात. त्याचाच वापर जैवतंत्रज्ञानासाठी केला आहे.
संशोधकांनी तंबाखूच्या पानापासून मिळणाऱ्या स्टार्चच्या प्रमाणात ७०० टक्के तर किण्वन क्रिया केलेल्या शर्करेच्या प्रमाणात ५०० टक्के इतकी वाढ जनुक संस्करणाने घडवून आणली आहे. थिओरेडॉक्सिन हे तंबाखूत असलेले प्रथिन इतर सजीवांमध्येही आढळतात. टीआरएक्स एफ या प्रथिनाचे असे स्टार्च नियंत्रणाचे काम लक्षात आल्यानंतर आता संशोधकांनी ऊर्जा निर्मितीसाठी म्हणजे जैव इंधने तयार करण्यासाठी त्याचा वापर करण्याची कल्पना पुढे आणली आहे. जनुक संस्कारित तंबाखूत ५०० टक्के जास्त किण्वनीय शर्करा असते. रूथ सांझ बॅरिओ या कृषी वैज्ञानिकाने नॅवरे विद्यापीठात तंबाखूवर काही प्रयोग केले त्यात असे दिसून आले की, त्यातील थिओरेडॉक्सिझन एफ व एम यांची क्षमता वाढवून स्टार्चचे प्रमाण वाढवता येते. थिओरेडॉक्झिन एफ हे एम पेक्षा काबरेहायड्रेट म्हणजे कबरेदकांच्या चयापचयात जास्त नियंत्रण घडवून आणीत असते. त्याच्या प्रमाणात वाढ झाल्यास तंबाखूच्या पानातील स्टार्च ७०० टक्के वाढते व त्याचे कारण तंबाखूचे हे रोप जनुकसंस्कारित असते साध्या तंबाखूच्या रोपात ते प्रमाण एवढे नसते.  
रूथ म्हणाले की, या साखरेच्या मदतीने आपण जैवइथेनॉल तयार करू शकतो व एक टन तंबाखू पानांपासून ४० लिटर जैवइथेनॉल तयार करता येते, असे नॅशनल सेंटर फॉर रिन्यूएबल एनर्जी या संस्थेच्या अंदाजानुसार दिसून आले. या संस्थेने त्याची वितंचक चाचणी केली होती. याचा अर्थ तंबाखूपासून आपण दहा पटींनी अधिक जैवइथेनॉल तयार करू शकतो. साध्या तंबाखूपासून एवढय़ा प्रमाणात इथेनॉल कधीच तयार करता येणार नाही असे रूथ यांचे म्हणणे आहे.
दसपट इथेनॉल निर्मिती
जनुकसंस्कारित तंबाखूच्या रोपात स्टार्च व शर्करेचे प्रमाण खूप वाढते त्यामुळे एक टन तंबाखू पानांपासून ४० लिटर जैवइथेनॉल तयार करता येते. तंबाखूपासून आपण दहा पटींनी अधिक जैवइथेनॉल तयार करू शकतो. साध्या तंबाखूपासून एवढय़ा प्रमाणात इथेनॉल कधीच तयार करता येणार नाही असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.